महात्मा जोतिराव  फुले कर्जमुक्ती योजना आधार प्रमाणिकरणासाठी जिल्हयातील गावांची यादी प्रसिध्द

0
285
वाढदिवसाच्या शुभेच्छा

 भंडारा, दि. 1 :-  शासनाने राज्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 जाहिर केलेली आहे. त्यानुसार या योजनेंतर्गत भंडारा जिल्हयातील ज्या शेतकऱ्यांकडील 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात अल्पमुदत पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2019 रोजी मुद्दल  व व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली रक्कम रुपये 2 लाखापर्यंत आहे. अशा शेतकऱ्यांचे  अल्प, अत्यल्प भूधारक या प्रमाणे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता, त्यांच्या कर्ज खात्यात रुपये  2 लाखापर्यंत  कर्जमुक्तीचा लाभ महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेंतर्गत देण्यात येणार आहे.

त्यानुषंगाने जिल्हयातील सर्व राष्ट्रियकृत बँकेने त्यांचे कडील 10 हजार 110 पात्र खात्यांची व भंडारा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित भंडारा बँकेतील 25 हजार 215 पात्र खात्यांची माहिती 1 ते 28 टेम्प्लेट मध्ये भरुन शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे.यापैकी शासनाने प्रायोगिक तत्वावर जिल्हयातील भंडारा तालुक्यातील शहापूर व सिल्ली या दोन गावांमधील राष्ट्रियकृत बँक, ग्रामिण  बँक तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकच्या 240 शेतकऱ्यांची यादी 24 फेब्रुवारी 2020 रोजी प्रसिध्द केलेली आहे. तसेच 29 फेब्रुवारी 2020 रोजी 25 हजार 10 इतक्या शेतकऱ्यांची असे एकूण 25 हजार 250 शेतकऱ्यांची प्रसिध्द केलेली आहे. सदरहू यादी संबंधित गावांमधील आपले सेवा केंद्र, सीएससी केंद्र, चावडी, ग्रामपंचायत कार्यालय, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे कार्यालय तसेच संबंधित बँकेच्या शाखेत प्रसिध्द केलेली आहे.

 तरी पात्र शेतकरी सभासदांनी सदरहू यादीत आपले नाव असल्यास संबंधित आपले सेवा केंद्र, सीएससी केंद्र तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेच्या आधार प्रमाणिकरण केंद्रावर आपले विशिष्ट क्रमांक, बँक पासबुक व आधार कार्ड  घेवून आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मनोज देशकर यांनी केलेआहे.