पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या विभागीय अध्यक्षपदी विजयराव चव्हाण

0
235
वाढदिवसाच्या शुभेच्छा

नांदेड,दि. 1 :-  पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी सेवानिवृत्त कृषी अधिकारी,कृषी विभागात उल्लेखनीय कामगिरी करणारे विजयराव चव्हाण,नांदेड उत्तर जिल्हाध्यक्षपदी जुने निष्ठावंत पदाधिकारी, स्थापण झाल्यापासून संघटनेत काम करणारे प्रशांत आबादार, दक्षिण जिल्हाध्यक्षपदी कंधारचे कृषि व्यावसायिक तथा शेतकऱ्याच्या प्रश्नाविषयी वेळोवेळी जनजागृती करणारे ज्ञानोबा पाटील गायकवाड, महानगराध्यक्षपदी धानोरा येथील प्रगतशील शेतीनिष्ठ शेतकरी,गट शेतीचे प्रचारक पांडुरंग पोपळे पाटील यांची निवड करण्यात आली असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष भागवत देवसरकर यांनी जाहीर केले.
गेल्या दहा वर्षापासून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रश्नाविषयी वेळोवेळी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याच्या न्याय व हक्कासाठी शासन दरबारी प्रश्न मांडणाऱ्या पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या संघटनात्मक बांधणीसाठी या निवडी करण्यात आल्या आहेत, पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी यापुढे जोमाने काम करून संघटनेची जिह्वाभरात मजबूत बांधणी करण्याचे काम हाती घेऊन, महाराष्ट्राचे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासन दरबारी मांडून ते सोडवण्याचा ही प्रयत्न करणार असल्याचेही तसेच लवकरच सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना समवेत नांदेड जिल्हा दौरा करून तालुकाध्यक्ष, जिल्हा कार्यकारणी जाहीर करणार असल्याचेही भागवत देवसरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
निवडीबद्दल पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष संजय दळे पाटील, प्रदेश सचिव प्रा.विवेक सुकणे,गुणवंत पाटील आठरे,चक्रधर पाटील देवसरकर, धनंजय पाटील,शंकर पवार निवघेकर,संदीप पावडे,विनित पाटील,रामदास माळगावे, एकनाथ मोरे,अविनाश पाटील वाघमारे गजानन पाटील कदम,सचिन शिंदे रावसाहेब घुमरे, अरुण महाळनकर,मोतीराम पवार आदिनी अभिनंदन केले आहे.