त्या विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना मिळाली अपघाती विम्याची रक्कम

0
244

गोरेगाव,दि.01: तालुक्यातील कुèहाडी येथील रामकृष्ण विद्यालयात इयत्ता ११ वीत शिक्षण घेणारी विद्यार्थिनी शारदा ऋषीराम राऊत रा.पाथरी हिचे १३ ऑगस्ट २०१८ ला अपघातात मृत्यू झाला होता. विद्यार्थिनीच्या पालकाने या संदर्भात राजीव गांधी अपघात विमा योजनेंतर्गत मदत करण्यात यावी, याकरिता शिक्षण विभागाकडे अर्ज सादर करुन मागणी केली होती. परंतु त्यांच्या अर्जाची दखल घेण्यात आली नाही. ही बाब ऋषीराज राऊत यांनी राष्ट्रवादीचे युवा नेते रविकांत बोपचगे यांच्या निदर्शनास आणून दिली. रविकांत बोपचे यांनी याची त्वरित दखल घेत शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करुन अपघातातील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबियांना अपघात विमा योजनेचा लाभ मिळवून दिला.
शासनाने अपघातात मृत्यू झालेल्य विद्याथ्र्यांसाठी राजीव गांधी अपघात विमा योजना सुरु केली. या योजनेंतर्गत विद्याथ्र्यांना लाभ देण्याचे निर्देश शिक्षण विभागाला देण्यत आले. मात्र, दिरंगाई होत असल्याने अनेक प्रकरणी विद्यार्थी व त्यांचे कुुटुंब या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. रामकृष्ण विद्यालयात कुèहाडी येथे ११ वीचे शिक्षण घेत असताना शारदा श्रषीराज राऊत रा. पाथरी हिचे अपघातात सन २०१८ मध्ये निधन झाले. विद्यार्थिनीच्या पालकाने अपघात विमा योजनेच्या लाभासाठी शिक्षण विभागाकडे अर्ज सादर केले. परंतु लाभ देण्यास दिरंगाई होत असून ऋषीराज राऊत यांनी ही बाब राष्ट्रवादीचे युवा नेते रविकांत बोपचे यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर रविकांत बोपचे यांनी शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाèयांशी पाठपुरावा सुरु केला. दरम्यान २४ फेबु्रवारी रोजी ऋषीराज राऊत यांच्या नावे शासनाकडून ४० हजार रुपयाचे धनादेश मदत म्हणून देण्यात आले. रविकांत बोपचे यांच्या पाठपुरावयाला यश आले असून मदत निधी मिळवून दिल्याबद्दल पीडीत कुटुंब व परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले.