संशोधन केंद्रांच्या माध्यमातून कृषी क्रांती शक्य -अग्रवाल

0
89

नागपूर: जमिनीचा दर्जा,पिकांची सुबत्ता, अफाट पीक यासाठी कृषी क्षेत्रात सातत्याने कृषी संशोधनाची गरज आहे. इंसेक्टिसाईड इंडिया लिमि.ने या बाबीची गंभीर दखल घेत कृषिक्षेत्राच्या समृद्ध विकासासाठी अनुसंधान व विकास केंद्रे उभारली असून या माध्यमातून कास्तकारांना अत्याधुनिक दर्जाचे कृषी औषधे देण्यात येत असल्याचे या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश अग्रवाल यांनी सांगितले.
रसायनांच्या उपयोगामुळे जमिनीचा दर्जा व पोत घसरत असल्याचे वारंवार सांगण्यात येते.मात्र यामध्ये तितके तथ्य नसून उलट जमिनीचा पोत,दर्जा सुधारून मोठ्या प्रमाणात पिके घेता येतात.मात्र यासाठी अनुसंधानामक बाबीची गरज असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. जैविक उत्पादनांच्या निर्मितीसाठी रासायनिक उत्पादनापासून जैविक उत्पादनापर्यंत जाण्यासाठी फार कठीण काळ लागतो.जैविक तंत्रज्ञानावर आधारित निर्मित कीटकनाशकेही पिकांसाठी प्रभावी आहेत. मात्र याची वापर पद्धती आधी समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कृषी क्षेत्राची ही गरज लक्षात घेता इंसेक्टिसाईड इंडिया लिमि.ने जैविक उत्पादनही सुरू केली आहेत. या माध्यमातून जमिनीचा दर्जा सुधारून त्यांची क्षमता,ऊर्जा, उत्पादन क्षमता वाढविणे यासाठी अनुसंधान केंद्राच्या माध्यमातून यावर संशोधन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.