24.7 C
Gondiā
Thursday, August 6, 2026
Home विदर्भ संचारबंदीच्या काळात होमगार्डनाही संधी द्या-आ.अग्रवाल

संचारबंदीच्या काळात होमगार्डनाही संधी द्या-आ.अग्रवाल

0
320
गोंदिया,दि.20ः राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात कोणामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बांधव दिवसरात्र परिश्रम घेत आहेत.माजी सैनिक सुद्धा पोलिसांची हिरिरीने मदत करीत आहेत.त्यातच राज्यातील इतर जिल्ह्यात होमगार्डची सुध्दा मदत या संचारबंदीच्या काळात बंदोबस्तासाठी घेण्यात आली असून गोंदिया जिल्ह्यात सुध्दा होमगार्डची मदत घेऊन संधी देण्याची मागणी आमदार विनोद अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी यांनी पत्र लिहून केली आहे. होमगार्डची मदत घेतल्यास जिल्ह्यात सध्या बंदोबस्तावर रात्रदिवस असलेल्या पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत होणार असल्याचे म्हटले आहे.जिल्हाधिकारी यांनीही आ.अग्रवाल यांना सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.