25.7 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home विदर्भ अंध अपंगाना खा. प्रफुल पटेल यांच्या तर्फे जीवनावश्यक वस्तूची किट वाटप

अंध अपंगाना खा. प्रफुल पटेल यांच्या तर्फे जीवनावश्यक वस्तूची किट वाटप

0
495
लाखान्दुर,दि.20:-तालुक्यात अंध अपंग सह अत्यंत गरजू हजारो लोकांना जीवनावश्यक वस्तूची किट  खासदार प्रफुल पटेल यांच्या तर्फे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष बालु चुन्ने यांच्या नेतृत्वात वाटप करण्यात आले.
तालुक्यासह बारव्हा परिसरात अंध अपंग सह अत्यंत गरजूंना तान्दूळ,आटा,तेल,तुवरदाल,मिर्ची,हल्दी, नमक,किराणा जीवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात आले.तालुक्यातील गरजूअंध अपंगाना लवकर तीन चाकी सायकल,कर्ण यंत्र,व आरोग्य शिबिराच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात येणार आहे.यावेळी सरपंच गिरीश झोडे,उपसरपंच,मधुर उके,पोलिस पाटिल दिलीप सलामे,तंटामुक्ती अध्यक्ष रेवाचंद शेंदरे,,मिलिंद डोंगरे,बबन पिलारे,सुभाष दिवठे,ललित दाणे,डॉ.संदीप लोंढे,अनिल कापगते,संजय गोंधळे,श्रावण मेश्रांम,कैलास रामटेके,अन्य कार्यकर्ता व गावकरी उपस्थीत होते.