28.7 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ विविध परवानग्या व पासेस देण्यासाठी प्राधिकारी  नियुक्त

विविध परवानग्या व पासेस देण्यासाठी प्राधिकारी  नियुक्त

0
348

 भंडारा, दि.21 :  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात 3 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मात्र शासनाने जनतेच्या अडचणी लक्षात घेता 20 एप्रिल पासून काही सेवांना लॉकडाऊनमधून सुट दिली आहे. सुट देण्यात आलेल्या सेवा कोणत्या याबाबत जिल्हाधिकारी भंडारा यांनी सविस्तर आदेश निर्गमित केला आहे. या सेवा देत असतांना लागणाऱ्या परवानगीसाठी अधिकारी नियुक्त करण्यात आले असून नागरिकांनी परवानगी व पासेससाठी सर्व संबधितांशीच संपर्क साधावा असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

लॉकडाऊन वाढविल्यामुळे जिल्ह्यातंर्गत विविध कारणामुळे कामावरुन आलेल्या व्यक्ती, मजुर इत्यादी साठी वाहतुक पास व दळवळव्यवस्था कामासाठी खालील प्रमाणे कार्यवाही करावी. अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

  • जिल्हा अंतर्गत व्यक्तीच्या आरोग्य, इतर कामाचे निकड लक्षात घेवून त्यांना वाहतुकीसाठी किंवा जाणे-यंण्यासाठी परवानगी देण्याबाबतसंबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांनी त्यांचे कार्यक्षेत्रात कार्यवाही करावी. शासन आदेशातील मार्गदर्शपर सुचनानुसार विविध छोटे व्यवसाय, उद्योग, बाधंकाम व्यवसाय, जिवनावश्यक वस्तु वाहतुक व पुरवठा इत्यादी कामाचे परिचलन व समन्वय ठेवुन नियंत्रण करण्याकरिता खालील प्रमाणे सक्षम प्राधिकारी घोषीत करण्यात येत आहेत. जिवनावश्यक वस्तु (किराणा, भाजीपाला, पोलट्री इत्यादी) शहरी भागाकरिता संबंधित मुख्याधिकारी नगर पालीका/नगर पंचायत व ग्रामीण भागाकरिता संबंधित तहसिलदार. हे प्राधिकारी असणार आहेत.
  • बांधकाम व्यवसाय, पाणी पुरवठा, जलसिंचन योजना (शहरी भागाकरिता) – संबंधित मुख्याधिकारी नगर पालीका,  नगर पंचायत व ग्रामीण भागाकरिता संबंधित तहसिलदार.
  • हॉटेल व्यवसाय (जेवनाची घरपोच सेवा फक्त), बेकरी शहरी भागाकरिता संबंधित मुख्याधिकारी नगर पालीका/नगर पंचायत व ग्रामीण भागाकरिता संबंधित तहसिलदार.
  • विट भट्टी व्यवसाय, किराणा व्यवसाय तसेच तत्सम सुक्ष लघु व मध्यम उद्योग शहरी तसेच ग्रामीण भागाकरिता संबंधित तहसिलदार,
  • वैद्यकिय व इतर आकस्मिक कारणामुळे लोकांची आंतरजिल्हा वाहतुक व परिचलन- संबंधित उपविभागीय दंडाधिकारी (कार्यक्षेत्रा प्रमाणे)/पोलीस विभाग.
  • मोठे उद्योग तसेच सात्तत्यक्रिया (CONTINUOUS PROCLSS) उद्योग – विविध अटीच्या अधिन राहुन निवासी उपजिल्हाधिकारी परवानगी सक्षम असतील.
  • विविध आवास योजना (शबरी, रमाई, इंदिराआवास, पि.एम.ए.वाय. इत्यादी) ची कामे सुरु राहतील. कामावर जिल्हा अंतर्गत मजुर असतील. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्या बाहेरील मजुर असणार नाहीत, याबतची दक्षता संबंधित यंत्रणेने घ्यावी तसेच कामाच्या ठिकाणी नियमीतपणे वैद्यकिय तपासणी, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करणे बंधनकारक राहील.
  • जिवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला परवानगी
  •  जिवनावश्यक वस्तुंच्या  पुरवठा साखळीतील सर्व सेवा ज्यात उत्पादन, स्थानिक दुकानांत किंवा आवश्यक वस्तुंच्या मोठ्या दुकानांत होलसेल किंवा रिटेल किंवा ई-कॉमर्स कंपनीना सोशल डिस्टन्सिंगचे सक्तीचे पालन करून दुकाने उघउण्याची किंवा बंदकरण्याची वेळेचे कोणतेही बंधन न घालता परवानगी असणार आहे.
  • किराणा मालाची तसेच जीवनावश्यक वस्तुची लहान दुकाने, रेशनची दुकाने, दैनंदिन जीवनातील आवश्यक  अन्नधान्य , फळे व भाज्या, स्वच्छतसाठी आवश्यक गोष्टी , दुध व दुग्धजन्य वस्तुंची दुकाने, पोल्ट्री मांस व मासे , पाळीव प्राण्याचे किंवा इतरप्राण्यांचे अन्न व चारा यांनाही सोशल डिस्टन्सिगचे सक्तीचे पालन करत तसेच दुकाने सुरू किंवा बंद करण्याची वेळेची कोणतीही बंधने न घालता परवानगी देण्यात येत आहे.
  • जिवनावश्यक वस्तुंचा घरपोच पुरवठा करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी भंडारा यांची परवानगी घेणे आवश्यक राहील.

      * दंडात्मक तरतुदी *

लॉकडाउन उपायांचे उल्लंघन करणा-या कोणत्याही व्यक्तीवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या कलम ५१ ते ६० च्या कलमांनुसार कायदेशीर कारवाई करण्याच्या कारवाईस जबाबदार असेल. तसेच आयपीसी चे कलम १८८ आणि लागू असलेल्या इतर कायदेशीर तरतुदी नुसार राहील. असे आदेशात नमुद आहे.