27.2 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ गणेशपूर शेतकरी उत्पादक कंपनीचा सेवाभावी उपक्रम जीवनावश्यक वस्तु व भाजीपाला विनामुल्य वाटप

गणेशपूर शेतकरी उत्पादक कंपनीचा सेवाभावी उपक्रम जीवनावश्यक वस्तु व भाजीपाला विनामुल्य वाटप

Ø  450 किट व 550 क्विंटल भाजीपाला वाटप Ø  11 शेतकरी उत्पादक कंपन्याचा सहभाग

0
347

भंडारा,दि. 23:- कृषी विभाग आत्मा अंतर्गत शेतकरी उत्पादन कंपनी कार्यरत असून दररोज शासकनाकडून मागणीप्रमाणे जीवनावश्यक वस्तुंची किट तयार करणे व गरजू रेशन कार्ड नसणारे व बेघर लोकांना विनामुल्य भाजीपाला पुरवठा करण्याचे काम लॉकडाऊन सुरु झाल्यापासून गणेशपूर शेतकरी उत्पादक कंपनी गणेशपूर करीत आहे. जिल्हयातील 11 शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकरी हे त्या त्या गावातील गरजु लोकांना भाजीपाला विनामुल्य पुरवठा करीत आहेत. आतापर्यंत जीवनावश्यक वस्तंच्या 700 किट तयार झालेल्या असून 450 किटचे वाटप झालेले आहेत. जिल्हयातील दानशुर शेतकऱ्यांनी जवळपास 550 क्विंटल भाजीपाला गरजू लोकांना विनामुल्य वाटप केला आहे.

 गणेशपूर शेतकरी उत्पादक कंपनी लि. गणेशपूर यांचे मार्फत शेतकरी सदस्यांचे धान्य व इतर जीवनावश्यक वस्तु घेवून कंपनीमध्ये एकत्रित करुन किट बनविण्याचे काम कंपनीद्वारे केले जात आहे. या करीता कोणत्याही स्वरुपाचा मोबदला न घेता विनामूल्य किट तयार करुन माविमचे जिल्हा समन्वयक अधिकारी प्रदीप काथोळे यांचे मार्गदर्शनाखाली संबंधित तहसिलदार कडून जीवनावश्यक वस्तुंच्या किटची मागणी झाल्यानंतर गणेशपूर शेतकरी उत्पादक कंपनी येथून सदर किट प्राप्त करुन घेवून गरजु, रेशन कार्ड नसणारे व बेघर लोकांना  व तालुकास्तरावरील माविमचे व्यवस्थापक यांचे मार्फत घरपोच किटचे वाटप करण्यात येत आहे. कंपनीचे अध्यक्ष संजय एकापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनावश्यक वस्तु किट बनविण्याचे काम मौजे जाख, ता. भंडारा येथे अविरत चालू आहे.

 या जीवनावश्यक वस्तुंच्या किटमध्ये  पाच किलो तांदुळ व गहू, अर्धा किलो तूर डाळ व तेल, 200 ग्रॅम मिरची पावडर, 100 ग्रॅम मसाला, अर्धा किलो मिठ व 1 मास्क या जीवनावश्यक वस्तुंचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी केलेल्या आवाहनानुसार जिल्हयातील 11 शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकरी हे त्या त्या गावातील गरजु लोकांना भाजीपाला विनामुल्य पुरवठा करीत आहेत. यामध्ये जिल्हयातील सर्व कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी हे विनामुल्य भाजीपाला गरजु लोकांना देण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करीत आहेत. स्वयंपूर्तीने गरजू लोकांना विनामुल्य भाजीपाला त्या त्या गावामध्ये पुरवठा होत आहे. आतापर्यंत 700 किट तयार झालेल्या असून 450 किटचे वाटप झालेले आहेत. जिल्हयातील दानशुर शेतकरी यांनी जवळपास 550 क्विंटल भाजीपाली गरजू लोकांना विनामुल्य वाटप केल्याचे कंपनीचे अध्यक्ष संजय एकायपूरे यांनी सांगितले आहे.