यवतमाळ,दि.25 – गुरुवारी एकाच दिवशी कोरोनाचे नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शुक्रवारी दुपारी १२ पासून सोमवारी मध्यरात्री १२ पर्यंत असे चार दिवस सलग शहर कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले. त्यातच कोरोना रुग्णाच्या तपासणीचा अहवाल शनिवारी सकाळी प्राप्त झाला. यामध्ये १६ रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी दुजोरा दिला आहे.आता शासकीय रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात दाखल असलेल्या कोरोना रुग्णाची संख्या ३१ झाली आहे. एकाचवेळी १६ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. जिल्ह्याची आतापर्यंतची कोरोना बाधितांची संख्या ४१ झाली आहे.





