आमगाव, दि. ३:-आज संपूर्ण राज्यात कोविड 19चा प्रादुर्भाव सुरू आहे मजुरांना काम नाही खायला अन्नधान्य नाही अश्या वेळी शासनाने मदतीचा हात दिला परंतु भ्रष्टाचारी अधिकारी व स्वस्त धान्य दुकानदार संगनमत करून कार्डधारकांना अन्नधान्य कमी देत असल्याची आरडाओरड शिवणी येथील गावकरी करीत आहेत.. सविस्तर
तालुक्यातील शिवणी गावातील स्वस्त धान्य दुकानदार राशन कार्डधारकांना नियमानुसार धान्य वाटप करीत नसल्याची तक्रार तहसीलदार यांचे कडे केली असता तहसीलदार त्या दुकानदाराची चौकशी न करता उलट तक्रारकर्त्याला तुम्ही गावातील शांती भंग करीत आहात तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी धमकी दिल्याची माहिती संतोष सती शहरे,संदीप उके, नामदेव पागोटे यानी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.
स्वस्त धान्य दुकानदाराविरुद्ध तक्रार करून करून सुद्धा कारवाई होत नसल्यामुळे पत्रकार परिषद आयोजित करून त्यानी माहिती देतांनी सांगितले की, स्वस्त धान्य दुकानदार मागील कित्येक वर्षांपासून राशन कार्ड धारकांना कमी धान्य वाटप करून हे धान्य काळ्या बाजारात विक्रीकेले जाते आहे याबाबत अनेकदा अन्न पुरवठा विभागाकडे व तहसीलदार दाराकडे तक्रार केली असता सुध्दा त्यांनी कोणतीही चौकशी केली नाही. स्वस्त धान्य दुकानदाराला तहसीलदारांचे अभय असल्याने दुकानदार कार्डधारकांना१० ते१५ किलो धान्य कमी देत असल्याचे सांगितले. व तहसीलदार यांना निवेदन देऊनस्वस्त धान्य दुकान शिवणी येथील त्याच बचत गटातील महिलांना चालविण्यासाठी देण्यात यावे अशी मागणी केली. परंतु तहसीलदारांनी कुठल्याही प्रकारची चौकशी न त्याच दुकानदाराला दुकान चालविण्यासाठी दिले. या संदर्भात तहसीलदार यांना विचारपूस केली असता तुम्ही गावातील शांतता भंग करता तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी धमकी दिल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत संतोष सती शहारे, संदीप उके, नामदेव पागोटे व त्यांच्या सोबत असलेल्या गावकऱ्यांनी दिली आहे. संबंधित दुकानदार व अधिकाऱ्यांवर शासनाने चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी पत्रपरिषदेच्या माध्यमातून केली आहे. तसेच त्यानी आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहेशराम कोरोटे यांना सुध्दा निवेदनातुन चौकशीची मागणी केली आहे परंतु त्यांनी सुद्धा या मागणीकडे लक्ष दिले नसल्याचे सांगितले.





