25.2 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ जिल्हा प्रशासनाच्या निर्णय प्रकियेतील अपयशाने नागरिकासंह व्यावसायिकांमध्ये संभ्रम

जिल्हा प्रशासनाच्या निर्णय प्रकियेतील अपयशाने नागरिकासंह व्यावसायिकांमध्ये संभ्रम

0
1182

गोंदिया,दि.४ :कोरोना रुग्णांच्या संख्येनुसार केंद्र सरकारने विविध जिल्ह्यांचे ग्रीन, ऑरेंज आणि रेड अशा तीन विभागात विभाजन करीत ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये आज सोमवारपासून (दि.४) काही व्यवहारांना शिथिलता देण्याची घोषणा केली होती. मात्र या संदर्भातील नेमक्या मार्गदर्शक सूचना स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून आज सोमवारचा दुपारच्या वेळ लोटूनही जाहीर करण्यात आल्या नाही.यावरुन प्रशासनाचे अधिकारी हे सरकारने आधिच सुचना दिल्यानंतरही निर्णय घेण्यात असक्षम ठरल्यामुळेच परिणामी जनतेने केंद्र व राज्यसरकारने केलेल्या घोषणेच्या आसरा घेत जिल्ह्यातील रस्त्यावरील वाहतुक व गर्दि बघायला मिळाली.तर शहर आणि ग्रामीण भागातील व्यावसायीकांमध्ये मात्र प्रतिष्ठाने उघडण्यावर संभ्रम दिसून आला.त्यातही शहरातील अनेक दुकाने बाजारपरिसरात उघडल्याचे बघावयास मिळाले.सकाळपासूनच दारुची दुकाने सुरु होतात की काय याकडे तळीरामांची नजर लागली होती.रेलटोली परिसरातील एका वाईनशाॅप समोरतर नागरिकांनी गर्दीही करुन टाकली होती,तर एका तळीरामांने तर चक्क दुकानासमोरच उभे होत नमस्कार करुन टाकल्याचे चित्र बघावायस मिळाले.

blank
सोशल डिस्टिसंगचा फज्जा उडविणारे शंकरगल्लीतील हे दुकान

शहरात फेरफटका मारल्याव जीवनावश्यक वस्तूंसह  यापुर्वी परवानगी दिलेल्या विविध दुकानांसह इतर दुकानांचेही शटर उघडले गेल्याचे चित्र बघावयास मिळाले.रस्त्यावर दुचाकीसह चारचाकी वाहनांचीही मोठी गर्दी दिसायला लागली. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मागील दीड महिन्यापासून सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू आहे. त्यामुळे केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व व्यावसायीक प्रतिष्ठाने बंद आहेत.त्यामुळे शहरातील संपूर्ण बाजारपेठ ठप्प पडली आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊनमध्ये पुन्हा १७ मे पर्यंत वाढ केली आहे. मात्र ग्रीन आणि आॅरेंज झोनमध्ये काही व्यवहारांना शिथिलता देण्याची घोषणा केल्याने व्यावसायिकांसह नागरिकांना थोडा दिलासा मिळण्याची आशा होती. सोमवारी सकाळपासून शहरातील बाजारपेठेत थोडी फार वर्दळ सुरू होईल अशी अपेक्षा होती. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाने सोमवारपासून कुठली दुकाने, व्यवसाय सुरू करण्यास लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली आहे, याबाबत मार्गदर्शक सूचना हे वृत्त प्रकाशित करेपंर्यंत प्रसिध्द केल्या नाही. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील व्यावसायिकांमध्ये सुध्दा यावरुन संभ्रम होता.

blank
रेलटोली परिसरातील जायस्वाल यांच्या वाईनशाॅप समोर दुकान उघडण्याची वाट बघणारे ग्राहक

विशेष म्हणजे केंद्र व राज्यशासनाने स्पष्टपणे जिल्हाप्रशासनाला निर्णय घेण्याच्या सुचना दिल्यानंतरही जाणिवपुर्वक स्थानिक प्रशासन निर्णय घेण्यात टाळाटाळ करीत असल्याचेच चित्र समोर येत आहे.तर दुसरीकडे बँकामध्ये सोशल डिस्टिसिंगचा फज्जा उडालाा असून स्टेट बँकेच्या एका शाखेत तर शाखाप्रबंधकासह कर्मचारी काजुकिसमीस खाण्यात व्यस्त होते.लिंक फेलच्या नावावर 11 वाजेपासून आलेल्यांना बसवून ठेवले मात्र 11.30नंतर आलेल्या काही खास व्यापारी वर्गांची रोकड मात्र जमा करुन सामान्य नागरिकांना बसवून ठेवण्यात त्या बँकेच्या प्रशासनाने धन्यता मानल्याचेही चित्र समोर आले.