24.6 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ शिव भोजनाचा लाभ नागरिकांनी घ्यावा ः नाना पटोले

शिव भोजनाचा लाभ नागरिकांनी घ्यावा ः नाना पटोले

0
765

साकोली,दि.04 – राज्य शासनाच्या माध्यमातून  सुरू करण्यात आलेल्या शिव भोजन केंद्राच्या माध्यमातून सवलतीच्या दरात  गरीब गरजू व निराधार नागरिकांना  जेवणाची सोय व्हावी  कोणीही या राज्यात  उपाशी राहू नये  या संकल्पनेतून  राज्यात शिव भोजन केंद्र उघडण्यात येत आहेत या शिव भोजनाचा लाभ  नागरिकांनी   घ्यावा  असे आव्हान साकोली येथील  शिव भोजन केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष  नानाभाऊ पटोले  यांनी केले

महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार अन्न नागरी पुरवठा  व ग्राहक संरक्षण विभाग मार्फत राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने साकोली येथील होमगार्ड परेड ग्राउंड वरील सेवा सहकारी संस्थेच्या इमारतीमध्ये शिव भोजन केंद्राचे शुभारंभ राज्याचे विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते करण्यात आले

यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, तहसीलदार बाबा तेढे, दिशा फाउंडेशनच्या संचालिका  सरीता फुंडे, बीडीसीसी बँकेचे संचालक व जि प सदस्य होमराज कापगते, जि प सदस्य अशोक कापगते,  जि प सदस्य दीपक मेंढे, माजी पंचायत समिती सभापती मदन रामटेके, जगत रहांगडाले मान्यवर मंडळी व कार्यकर्ता उपस्थित होते.शासनाने जाहीर केलेल्या शिव भोजन योजनेअंतर्गत  शासकीय अनुदान प्राप्त दिशा फाउंडेशन च्या माध्यमातून साकोली येथील शिव भोजन केंद्र प्रति दिवस 100 थाळी चे वाटप सध्या करणार असून भविष्यात मागणी वाढल्यास  थाळीची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे संचालिका सरिता फुंडे यांनी सांगितले