25 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ नगरसेवक पानतावणेकडून मास्क,सेनेटायझर, हँडवॉश तसेच फळभाज्यांचे वितरण

नगरसेवक पानतावणेकडून मास्क,सेनेटायझर, हँडवॉश तसेच फळभाज्यांचे वितरण

0
439
गोंदिया,दि.05:-  कोरोनाव्हायरसने संपूर्ण जगात दहशत पसरविली आहे.सर्वत्र हाहाकार माजला आहे. असंख्य लोकांचा बळी गेलेला आहे.भारत देशासह राज्यालाही त्याचा फटका बसला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक प्रकारच्या उपाययोजना करत आहे. देशांत तसेच राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण जनजीवन अस्ताव्यस्त झालेला आहे. उद्योग रोजगार, व्यवसाय तसेच ट्रेन, बस सेवा, विमानसेवा सर्वत्र बंद आहे. यामुळे अर्थव्यवस्थेची चाके थांबले आहे.रोजीरोटीच्या कामावर जाणारे असंख्य मोलमजुर, शेतकरी, कामगार, या सर्वांचे बेहाल होतानाचे चित्र डोळ्यासमोर दिसत आहेत परप्रांतात पोटाची खळगी भरायला गेलेले असंख्य कामगार दररोज रस्त्याने पायी-पायी तीनशे ते चारशे किलोमीटरचा प्रवास करताना दिसत आहेत. सर्वत्र सर्वांना त्रास सहन करावा लागत आहे. अशातच केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच अनेक सामाजिक संस्था, एनजीओ, तसेच समाजसेवक,राजकारणी, अभिनेते, उद्योजक,ट्रस्ट काही सरकारी कर्मचारी आधी गरजूंच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. अशातच गोंदिया नगर परिषदेतील मरारटोली प्रभाग क्रमांक एकचे  नगरसेवक घनश्याम पानतावणे यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वतः कडून प्रभाग क्रमांक एक येथील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक घरी कोविड 19 ची लढाई लढण्यासाठी हँड सेनीटायझर,लाइफबॉय हँडवास,कॉटनचे हाताने बनवलेले मास्क याबरोबरच गरजूंना सहा किलो हिरव्या फळभाजीपाल्याचे वितरण केले.हे वाटप कार्य त्यांनी आपल्या संपूर्ण प्रभागांमध्ये केले आहे. तसेच जेव्हापासून पासून राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे  तेव्हापासून नगरसेवक घनश्याम पानतावणे स्वतःकडून गरजू पीडित, निराधार ,दिव्यांग, वृद्ध अशा अनेकांना ते मदत कार्य करत आहेत.विशेष उल्लेखनीय बाब ही की  या आधीही त्यांनी प्रभागातील कोणताही नागरिक उपवाशी राहू नये यासाठी दहा किलो तांदूळ, तीन किलो हिरवा भाजीपाला, डाळ, साखर,आटा, सोयाबीन वडी, साबण, तिखट,मिठ, हळदी,मसाला अश्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले होते. आधीपासूनच समाजसेवेचे व्रत तसेच सद्यस्थितीत निर्माण झालेल्या परिस्थितीत अनेक गरजूंना जी मदत लागेल ती मदत ते सतत करत येत आहेत. प्रभागातील अनेक चांगली कार्य त्यांच्या हातून घडत आहेत सिमेंट रस्ते,वीज , पाणी, नाल्यांची साफसफाई तसेच ईतर महत्वपुर्ण कार्य  त्यांच्या कडून घडत आहेत.या प्रसंशनिय  कार्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.या वितरण प्रसंगी संदीप राऊत कैलास मरठे, सुल्लोद्दीन तिघाला,अहमद मनिहार आणि तसेच त्यांचे सहयोगी मित्रमंडळी या कार्यात त्यांची मदत करीत आहेत.