गोंदिया,दि.06ः-भारतीय कम्युनिस्ट पार्टी गोंदिया जिल्हा कौंसील तर्फे का.कार्ल मार्क्स यांच्या २०२ व्या जयंती निमित्त पक्ष कार्यालयात का.मार्क्स यांच्या चित्रावर पुष्प अर्पण करूण अभिवादन करण्यात आले.का.कार्ल मार्क्स यांचा जन्म ५ मे १८१८ला जर्मनी येथे झाला.सामाजिक न्याया करिता चालू संघर्षाच्या काळात मार्क्सच्या विचारांना टाळता येऊ शकत नाही ते केवळ वर्गीय शोषण व वर्गीय संघर्ष पर्यंतच सिमीत नसुन मार्क्सने राष्ट्रीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, जातीयवादी शोषण या प्रश्नांवरही विचार केला आहे.त्यांनी भारतीय समाजावर ही व त्यातील विशेषता व अंतर्गत विरोधावर विस्तारित अध्यन केले. असामनतेची कारणे व यातुन सुटका मिळण्याचे विचार ही मांडले आहेत. कार्ल मार्क्स यांची लेखनी व दृष्टिकोण केवळ युरोपीय समाज पुरता केंद्रीत नसुन विश्व समाज केंद्रीत होता. मार्क्सने इतिहासाच्या भौतिकवादी अवधारणेच्या अंतर्गत सर्व समाजातील वस्तुगत रूपाने असलेल्या नियमांची खोज केली. कार्ल मार्क्स भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाचा लढ्याचा (१८५७-१८५९) बारकाइने अभ्यास करूण वास्तव जगासमोर मांडला .कम्युनिस्ट घोषणा पत्र व दास कॅपीटल या पुस्तकाचे वाचन व यावर तरूणांनी सामुहिक चर्चा करणे आवश्यक असल्याचे यावेळी विचार मांडण्यात आले. सर्व प्रकारच्या शोषणाच्या विरुद्ध व या पासुन मुक्ती करिता कार्ल मार्क्स यांच्या विचारांची व त्यांनी सर्वहारा वर्गा करिता केलेल्या लढ्याची आठवण करत अभिवादन करण्यात आले।या वेळी का.मिलिंद गनविर,का.रामचंद्र पाटील,का. करूणा गणविर,का,सुरेश रंगारी,राजकुमार शर्मा,जितेंद्र तुपट ई.कार्यकर्ते उपस्थित होते.





