25.2 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ दुधात भेसळ अन.शेतकर्यावरील अन्याय खपवून घेणार नाही-दुग्धविकास मंत्री सुनिल केदार

दुधात भेसळ अन.शेतकर्यावरील अन्याय खपवून घेणार नाही-दुग्धविकास मंत्री सुनिल केदार

बंद दुध संकलन केंद्राचे दुग्धविकास मंत्र्यांचे हस्ते शुभारंभ

0
280

गोंदिया,दि.11ः शेतकर्य़ांना शासकीय योजनांचा लाभ मिळायला हवा आणि दुग्धव्यवसायाच्या क्षेत्रात गोंदिया-भंडारा जिल्हे सधन व्हावे यासाठी दुग्धविकास मंत्री म्हणून विशेष लक्ष देत आहे.त्यामुळेच भंडारा जिल्हा दुग्धसंघाला 97 हजार लीटर दुधाचे पावडर तयार करण्याचे काम शासनाने दिले आहे.पश्चिम महाराष्ट्राला 1 लाख लिटरचे उदिष्ठ आहे,तर विदर्भात हे 97 हजार लिटरचे उदिष्ठ मिळाले आहे,यासाठी अधिकाधिक आणि उत्तम प्रतिचा दुध संकलित करुन पावडरकरीता भंडारा जिल्हा दुग्धसंघाला देण्यात येणार आहे.गेल्या काही वर्षापासून शेतकर्यांचे दुधाचे पैसे संघाने दिलेले नाहीत हे योग्य नसून तत्काळ तो पैसा शेतकर्याला मिळाला पाहिजे.मी कुठल्याही प्रकारचे भेसळ आणि शेतकयावरील अन्याय खपवून घेणार नाही अशा स्पष्ट शब्दात राज्याचे दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी विचार व्यक्त केले.

जिल्ह्यातील शासकीय दुध संकलन केंद्र सातगाव, कोहमारा  व गोंदिया याठिकाणाहून गेल्या गेल्या डिसेंबर महिन्यापासून दुध संकलन बंद असल्याने ते बंद पडले होते.त्या बंद संकलन केंद्रापैकी गोंदियातील संकलन केंद्राचा पुर्नःशुभारंभ कार्यक्रम आज(दि.11) राज्याचे पशु व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांच्या हस्ते करण्यात आले,त्याप्रसंगी ते बोलत होते.कुडवा येथील शासकीय बंद दुध संकलन केंद्राच्या शुभारंभप्रसंगी जिल्ह्याचे खासदार सुनिल मेंढे,आमदार विनोद अग्रवाल,आमदार मनोहर चंद्रीकापुरे,आमदार सहसराम कोरेटे,भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे,जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पुुरुषोत्तम कटरे,डाॅ.झामसिंह बघेले,माजी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे,माजी सभापती पी.जी.कटरे,दुग्ध संघाचे अध्यक्ष राजकुमार कुथे,संचालक पंकज यादव,डाॅ.लक्ष्मण भगत यांच्यासह जिल्हा दुग्ध विकास अधिकारी लाखे,जिल्हा पशुसंवर्धन विकास अधिकारी डाॅ.राजेश वासनिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी त्यांनी जिल्हा दुग्ध संघ व शासकीय दुध शितकरण केंद्रातील अधिकारी व पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली.जिल्हा दुग्ध संघाचे अध्यक्ष राजकुमार कुथे यांनी यावेळी आपल्या मागण्याचे निवेदन सादर केले.त्यावेळी उपस्थित दुग्धसंघाच्या प्रभारी व्यवस्थापक श्रीमती बोकडे यांना खर्चावर काटकसर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.शासकीय दरापासून 5 रुपये दर कमी दिल्याचा मुद्दा उपस्थित करुन दुध उत्पादक शेतकर्यांनी दुध संघाकडे असलेल्या सव्वा कोटी रुपयाची थकबाकी मिळवून देण्याची मागणी परस बसेने,सचिन अवस्थी,मयाराम दसरे यांनी मंत्र्याकडे केली.त्यावर मंत्री केदार सुध्दा अचबिंत झाले.आपणास दिलेल्या माहितीपत्रकात या थकबाकीचा उल्लेख का केला नाही अशा शब्दात जिल्हा दुग्धविकास अधिकार्याला खडसावत सविस्तर माहिती देण्याचे निर्देश दिले.आमगाव,देवरी व सालेकसा तालुक्यातील दुध गोंदियातील शीतकरण केंद्रात आणणे परवडणारे नसल्याने सातगाव येथील शासकीय दुध संकलन व शितकरण केंद्र सुरु करुन तिथे स्विकारण्याची मागणी त्या पुरुषोत्तम कटरे,पंकज यादव,राजु काळे आदींनी केली.

गुणवत्तापुर्ण दुधच स्विकारणार-सुनिल फुंडे

गोंदिया जिल्हा दुध संघाच्यावतीने आजपासून जे दुध संकलन करुन भंडारा येथील दुध संघाला पावडर तयार करण्यासाठी पाठविण्यात येईल त्या दुधाची गुणवत्ता असेल तरच आम्ही तो स्विकारु अन्यथा तो दुध परत करणार अशा कडक शब्दात सांगितले.त्याकरीता दुध संकलित करतांना गुणवत्तापुर्ण दुध स्विकारण्यासोबतच दुधासाठी वापरण्यात येणारे सध्याचे सर्व कॅन तत्काळ बंद करुन नव्या कॅनचा वापर करण्याच्या सुचना भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व भंडारा जिल्हा दुग्ध सहकारीसंघाचे मार्गदर्शक संचालक सुनिल फुंडे यांनी केल्या.