अर्जुनी मोरगाव,दि.11: सगळीकडे कोरोणाने थैमान घातले आहे,जिल्ह्याची व तालुक्याची सद्यस्थितीती सुदैवाने बरी आहे,ती यापुढे देखील अशीच असावी यासाठी आरोग्याच्या सोयी सुविधा साधने आरोग्य केंद्रांमध्ये असावीत या उदात्त हेतूने आपल्या जन्म दिनाच्या औचित्याने तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सौ. रचना गहाणे यांनी जिल्हा विकास निधी अंतर्गत आठ लाखांच्या निधीतून (दि.०६) रोजी अत्याधुनिक उपकरणे व आरोग्य विषयक साहित्याचे वाटप आरोग्य केंद्रांना केले.
कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा नागरिकांना मिळाल्या पाहिजेत गावातील जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये निदान झाले पाहिजे,आधुनिक उपकरणांसह इतर आवश्यक सुविधा घेण्यासाठी निधीची तरतूद नव्हती त्यामुळे आपल्या जिल्हा विकास निधी अंतर्गत तालुक्यात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना मदतीचा हात दिला आहे.
त्यांनी आपल्या जन्मदिनी प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगाव,प्राथमिक आरोग्य केंद्र धाबे/पवनी येथे पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर तालुका आरोग्य अधिकारी विजय राऊत,उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती लायकराम भेंडारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत साहित्य त्या- त्या प्रा.आ.केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व गावातील सरपंचांना वाटप केले.यावेळी वैद्यकीय अधिकारी गोदेले गोठणगाव,वैद्यकीय अधिकारी धाबे/पवनी प्रविण दखणे,विनोद नाकडे,भोजू लोगडे,सि.बी.टेंभूंर्णे,अनेक गावांमधील सरपंच,आरोग्य सेविका,आशा सेविका,आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
या साहित्यांचा समावेश
प्लस ऑक्सिमिटर,पीपीई किट,इन्फोरेड थर्मामिटर,सॅनिटाईझर, हायप्लॉकोराईड सोल्युशन,ग्लोज पॅकेट,हॅन्ड वॉश स्टेशन,एन 95 प्रत्येक गावांना ५०० ते १००० मास्क,पम्प मशीन,हॅन्ड वॉश सोल्युशन ई चा समावेश आहे.
देश मोठ्या संकटातून जात आहे,कोरोना महामारीच्या विरोधात जे युद्ध सुरू केले आहे,त्यात आपल्याला विजय मिळेलंच अशी खात्री आहे,मात्र तरीही आपल्याला सावध सशक्त असणे गरजेचे आहे,संपूर्ण देश ठप्प झाला असून सर्व यंत्रणा युद्ध पातळीवर लढत आहेत,अशातच आपल्या मार्फत जेवढं शक्य होईल तेवढे करण्याचा प्रयत्न आहे.गोर गरीब जनतेला सर्व सोयी सुविधा साधने आरोग्य केंद्रात उपलब्ध करून आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचा छोटासा प्रयत्न करीत आहे.
रचना गहाने
माजी जि.प.उपाध्यक्षा तथा जि.प.सदस्या





