26.1 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ उष्माघातापासून स्वत:चा बचाव करा

उष्माघातापासून स्वत:चा बचाव करा

0
556

गडचिरोली,दि.15ःजिल्ह्याचे तापमान ४४ सेल्सिअस अंशावर गेले असल्याने उष्माघात टाळण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे आवाहन यांनी केले आहे.
डॉ.अनिल रुडे व डॉ. शंशीकांत शंभरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार शरीराचे तापमान संतुलित ठेवावे. मानवी शरीराचे तापमान १0६ अंश फॅरेनहाईट किंवा ४१ सेल्सिअस अंश इतके वाढते तेव्हा त्याला उष्माघात असे म्हणतात. उष्माघात हा सर्वात गंभीर प्रकार आहे आणि वैद्यकीय आणीबाणी मानले जाते. उष्माघात हा प्रामुख्याने ५0 वर्ष वयोगटातील तसेच तरून वयोगटातील व्यक्तींनादेखील होऊ शकतो. मानवी शरीराचे तापमान साधारणत: ३७ अंश सेल्सिअस किंवा ९८.६ अंश फॅरेनहाईट असते. मानवी शरीराच्या तापमानता समतोल राखण्याची क्रिया संपुष्टात आल्यानंतर बेशुध्दावस्था येते. प्रसंगी रुग्णाचा मृत्यूदेखील होऊ शकतो. तीव्र तापमानामध्ये शरीराचे तापमान वाढते. डोकेदुखी, चक्कर येणे, कमजोरपणा वाटणे, हृदयाचे ठोके वाढणे, चिडचिड वाढणे, गोंधळल्यासारखे वाटणे, खुप तहाण लागणे, उष्णता असूनही घाम कमी येणे, उलट्या होणे आदी उष्माघाताची लक्षणे आहेत.
बाहय उष्माघात व परंपरांगत उष्माघात असे उष्माघाताचे प्रकार आहेत. बाह्य़ उष्माघात हा खेळाडू, सैनिक, शेतात व उन्हात काम करणारे मजूर, दुचाकी प्रवास करणार्‍या होऊ शकतो, तर वयोवृध्द, लठ्ठपणा, मधुमेह असणार्‍यांना परंपरांगत उष्माघात होऊ शकतो, असे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले आहे.