27.4 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही;आरोग्य सेतू ॲप्सवर अनावधानाने चुकीची माहिती

जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही;आरोग्य सेतू ॲप्सवर अनावधानाने चुकीची माहिती

0
813

गोंदिया दि.१5:जिल्ह्यात दोन व्यक्तींनी आरोग्य सेतू ॲप्समध्ये अनावधानाने चुकीने पॉझिटिव्ह असल्याचे लिंक सादर केल्याने आरोग्य सेतू ॲप्सवर जिल्ह्यात दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे दिसत आहे. परंतु जिल्ह्यात कुठेही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही.या दोन्ही व्यक्तींचा शोध घेऊन त्या व्यक्तींवर आरोग्य विभागामार्फत चौकशी व कार्यवाही सुरू आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस विभाग यासह अन्य विभाग रात्रंदिवस मेहनत घेत असल्यामुळे जिल्हा कोरोनामुक्त आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने आरोग्य सेतू अँप्स विकसित केला आहे. अँड्रॉइड मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ॲप्स हा डाऊनलोड करून स्वयम् परीक्षण करण्याचे आहे.

फक्त एकच रुग्ण 26 मार्चला पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्याच्यावर औषधोपचार करून त्याचा कोरोना विषाणू चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे १० एप्रिलला त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.सद्यस्थितीत जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही.

आरोग्य सेतू अँप्स हा कोरोना विषाणूच्या अनुषंगाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आला आहे.या ॲप्सचा दुरुपयोग किंवा कुठलाही गैरवापर कोणीही करू नये. या ॲप्स खोटी माहिती टाकल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते.आरोग्य सेतू अँप्सवर खोटी माहिती भरल्यास रोग प्रतिबंधक कायदा १८९७ अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो.जिल्ह्यातील नागरिकांनी आरोग्य सेतू अँप्सवर खरी माहिती भरावी. खोटी माहिती भरून त्याचा दुरुपयोग करू नये,असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी कळविले आहे.