25.2 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ सौंदड येथे विलगीकरणा असलेल्या दुलीचंद मांढारकर यांचे निधन.

सौंदड येथे विलगीकरणा असलेल्या दुलीचंद मांढारकर यांचे निधन.

0
1090

सडक अर्जुनी,दि.18ःतालुक्यातील सौंदड येथील कृष्णा वार्डातील रहिवासी दुलीचंद आत्माराम मांढारकर (वय 35 वर्षे) यांचे आज सकाळी निधन झाले.सकाळी त्यांच्या कुटुंबीयांनी झोपेतून का जागा झाले नाही? हे बघून त्यांना उठवायला गेले तेव्हा, ते मृतावस्थेत आढळले. दुलीचंद मांढारकर हे 8 मे रोजी चेन्नईवरून परत आले होते. चेन्नईला ते रोजगारासाठी गेले होते.परतल्यानंतर ग्रामीण रुग्णालय सौंदड येथे जाऊन तपासणी केल्यानंतर त्यांना 14 दिवस घरीच विलगीकरण राहण्यास सांगितले गेले होते.त्यांची पत्नी रायपूरवरून त्याच दिवशी आल्या होत्या.त्यासुद्धा घरीच विलगीकरणा होत्या.त्यांच्यामागे पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,आई,दोन भाऊ असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. करोना काळात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.घरचा कमावता व्यक्ती गेल्यामुळे कुटुंब मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.