गडचिरोली,दि.२१ : जिल्हयात आणखी १ रुग्ण करोनाविषाणू पॉझिटीव्ह आढळून आला असून, आता पॉझिटीव्ह रुग्णांची एकूण संख्या ९ झाली. आज सकाळी साडेआठ वाजता प्राप्त अहवालानुसार आणखी एक रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. हा रुग्ण आरमोरी तालुक्यातील रहिवासी असून, मुंबईहून आल्याबरोबर त्याला आरमोरी येथील संस्थात्मक विलीगीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते. यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची एकूण संख्या ९ वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.





