गडचिरोली,दि.२१: नक्षल्यांनी काल रात्री अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील चौकात बॅनर लावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.रात्री सशस्त्र नक्षली गावात आले. सर्वप्रथम त्यांनी चौकातील सीसीटीव्ही कॅमेरा हलविला आणि बॅनर बांधले. २ मे रोजी सिनभट्टी जंगलात ठार झालेली नक्षली सृजनक्का हिच्या मृत्यूच्या निषेधार्थ २२ मेपर्यंत जिल्हा बंद ठेवण्याचे फर्मान नक्षल्यांनी सोडले आहे. परिसरात पत्रकेही टाकली आहेत. बॅनरवर भाकपा(माओवादी) अहेरी एरिया कमिटी, असा उल्लेख आहे.





