25.5 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ जि.प.पाणीपुरवठा विभागातील काही कर्मचार्यांमुळे स्थानिकांना करोनाची धास्ती

जि.प.पाणीपुरवठा विभागातील काही कर्मचार्यांमुळे स्थानिकांना करोनाची धास्ती

0
1963

गोंदिया,दि.26ः-सध्या देशात करोनासंसर्गामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यातच सरकारनेही फिजिकल डिस्टसिंगचे पालन करीत आपला कर्मचारी वर्ग सुरक्षित राहिला पाहिजे याकडे लक्ष देत जे ज्याठिकाणी आहेत त्याठिकाणीच थांबा असे आदेश दिले.परंतु दुसर्या व तिसर्या लाँकडाऊननंतर बहुतांश कर्मचारी आपल्या कर्तव्यावर हजर राहून मुख्यालयी राहू लागले.परंतु गोंदिया जिल्हा परिषदेतील बहुतांश कर्मचारी याला अपवाद राहिले.त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांचाच पाठिंबा आहे की काय अशी म्हणण्याची वेळ आली आहे.अनेक प्रसारमाध्यमांनी जिल्हापरिषदेत असे कर्मचारी असल्याचे वृत्तप्रकाशित केले,त्यात बेरार टाईम्सने तर प्रामुख्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले.

परंतु जिल्हाप्रशासनालाच गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या कर्मचार्यांना करोनाची लागण व्हावी की काय असे नियोजनच परजिल्ह्यातून दरआठवड्याला म्हणा किंवा दर दोन दिवसांनी ये-जा करणार्या कर्मचार्यांना सुट दिली की काय अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे.ती म्हणजे गेल्या तीन चार दिवसापासून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे आमच्या हितचितंकानी नजर ठेवली असता येथील काही कर्मचारी तुमसर,भंडारा व नागपूर येथे गेल्याचे आणि तिथून आल्याचे निदर्शनास आले.आज मंगळवारला सुध्दा काही कर्मचारी आपल्या गावावरुन आल्याचे सदर कार्यालयाला भेट दिल्यावर तेथीलच काही कर्मचार्याकडून कळले.सोबतच परजिल्हानिवासी असलेले अधिक्षक हे मोबाईल संदेशावर माझी सीएल घालून द्या असे सांगून आज कार्यालयात गैरहजर होते,म्हणजे ते आपल्या गावी गेले असल्याचे सांगण्यात आले.सोबतच या अपडाऊन कर्मचारी वर्गामुळे आम्ही स्थानिक कर्मचारी असुरक्षित असल्याचे अनेकांनी भितभित सांगितले.यावरुन कार्यालयातील अनेक कर्मचारी भितीच्या वातावरणात असून पुढे काही झाल्यास कार्यकारी अभियंता जेवढे दोषी असतील तेवढे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुध्दा असणार असे म्हटल्यास वावगे होणार नाही.त्यातच या कार्यालयातील भुवैज्ञानिक हे कार्यालयात येतात कधी आणि जातात कधी याचा काहीच लेखाजोखा कार्यालयात नसतो.त्यांची डायरी सुध्दा नसते ज्यात पुढील आठवड्यातील दौरा नियोजन जे कुठल्या गावात करणार हे सुध्दा उपलब्ध नाही.कार्यालयात सकाळी चेहरा दाखविल्यानंतर कुठे गेले साहेब तर अमुक तालुक्यात गेल्याचे सांगण्यात येते.सोमवारला एका भुवैज्ञानिकाला संपर्क केल्यावर आमगाव तालुक्यात सुट्टीच्या दिवशी पाहणी करीत असल्याचे सांगितले,तेच पुन्हा आज त्याच तालुक्यात गेल्याचे कार्यालयात गेल्यावर कळले.त्यासारखीच स्थिती कार्यालयातील अभियंत्याची आहे,ज्यांचे हलचल पुस्तक व डायरी अद्यापही पुर्ण नसल्याचे त्याच कार्यालयातून कळल्याने पाणी पुरवठा विभागात किती सावळा गोंधळ करोना काळात सुरु आहे.जेव्हा की सध्या पाणीटंचाईचा हंगाम आलेला असताना कुणाचेच कार्यालयावर वचक नसणे हे आयएसओ जिल्हापरिषदेचे मानक म्हणण्याची वेळ आली आहे.