25.5 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ जिल्ह्यात आज 1 नवा रुग्ण,जेवण पुरवठादारावर गुन्हा दाखल

जिल्ह्यात आज 1 नवा रुग्ण,जेवण पुरवठादारावर गुन्हा दाखल

0
2504

गोंदिया,दि.26- जिल्ह्यात आज 26 मे रोजी 1 रुग्ण आढळला असून जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या 49 झाली आहे.48 रुग्ण एक्टीव असून 1 रुग्ण यापुर्वीच बरा झालेला आहे.त्यातच आयसोलेशन वार्ड व क्वांरटाईन केंद्रावर जेवण पुरविण्याचे कंत्राट ज्याला दिलेले होते,त्याने वेळेचे पालन न केल्यामुळे तसेच जेवण व्यवस्थित न पुरविल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णात  अर्जुनी /मोरगाव तालुका – 28,सडक/अर्जुनी तालुका – 06,गोरेगाव तालुका – 03, आमगाव तालुका – 01,सालेकसा तालुका – 01,गोंदिया तालुका – 08,तिरोडा तालुका – 01रुग्ण आहे. जिल्ह्यात 857 व्यक्तींच्या घशातील स्त्रावांचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले आहे. एकूण 857 नमुन्यांपैकी आज  26/05/2020 रोजी 86 नमुने नागपूर येथे पाठविण्यात आले.नवीन 48 रुग्ण आणि 1 जुना रुग्ण बरा होऊन घरी गेला असून एकूण 49 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले