25.3 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी तालुक्यातील सर्व दारु दुकाने आजपासून बंद

अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी तालुक्यातील सर्व दारु दुकाने आजपासून बंद

आज तीन कोरोना बाधित रुग्ण आढळले तर २५ कोरोनामुक्त होऊन घरी परतले कोरोना बाधितांची संख्या ६२ ३४ क्रियाशील रुग्ण

0
2189

गोदिया दि.२९ःनागपूर येथील विषाणू प्रयोगशाळेतून आज २९ मे रोजी प्राप्त अहवालापैकी सायंकाळी ६ वाजतापर्यंत तीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. हे तीनही रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बधितांचा संख्या ६२ इतकी झाली आहे. आनंदाची बाब म्हणजे आजच २५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. कोरोनामुक्त झालेले एकूण रुग्ण २८ इतके आहे. जिल्ह्यात आता ३४ रुग्ण कोरोना क्रियाशील आहेत.दरम्यान जिल्हयातील अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी तालुक्यात रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या अधिकाराचा वापर करीत अर्जुनी मोरगावच्या उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी या दोन्ही तालुक्यातील देशी,विदेशी दारुची दुकाने,बीयरबार पुढील आदेशापर्यंत आजपासून बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

जिल्ह्यात पहिला कोरोना बाधित रुग्ण १० एप्रिलला बरा होऊन घरी गेला . दोन रुग्ण बरे झाल्याने त्यांना २८ मे रोजी सुट्टी देण्यात आली.तर तब्बल २५ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने आज २९ मे रोजी सुट्टी देण्यात आली असून त्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे.त्या सर्वांना ७ दिवसाच्या गृह अलगीकरणात राहावे लागणार आहे.

कोरोना विषाणूने जिल्हयात जे बाधित रुग्ण आढळले आहे त्यामध्ये १९ मे रोजी २ रुग्ण , २१ मे रोजी २७ रुग्ण,२२ मे रोजी १० रुग्ण, २४ मे रोजी ४ रुग्ण, २५ मे ४ रुग्ण , २६ मे रोजी १ रुग्ण, २७ मे रोजी १ रुग्ण ,२८ मे रोजी ९ रुग्ण आणि आज २९ मे रोजी ३ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे विषाणू चाचणी अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

आतापर्यंत ९५० व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.त्यापैकी ६२ नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह तर ८३१ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.५४ नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.

जिल्ह्यात एकूण १९ क्रियाशील कंटेनमेंट झोन आहे.यामध्ये गोंदिया तालुका – नवरगाव/कला, कटंगी, परसवाडा सालेकसा तालूका -धनसुवा, सडक अर्जुनी तालुका- तिडका, सालईटोला, रेंगेपार, वडेगाव,पांढरवाणी, गोपालटोली.गोरेगाव तालुका – गणखैरा, गोरेगाव येथील गंगाराम चौक ,आंबेतलाव तिरोडा तालुका – तिरोडा.अर्जुनी/ मोरगाव तालुका – करांडली,अरुणनगर, सिलेझरी ,बरडटोली व अरडतोंडीचा समावेश आहेजिल्ह्यातील ग्रामस्तरावर असलेल्या विविध शाळा व इतर संस्थांमध्ये ३९६४ आणि ८८४५ व्यक्ती गृह अलगिकरणात आहे.