26.3 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ मतदारसंघातील क्वारंटाईन केंद्रांना आ.अग्रवालांची भेट

मतदारसंघातील क्वारंटाईन केंद्रांना आ.अग्रवालांची भेट

0
417
गोंदिया,दि.31ः गोंदिया विधानसभा मतदारसंघामधील जिल्हा परिषद शाळांमध्ये तयार करण्यात आलेल्या क्वारटांईन केंद्राला भेट देऊ आमदार विनोद अग्रवाल यांनी तेथील अडीअडचणी जाणून घेतल्या.भेटी दरम्यान गोंदिया पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी जे एस राऊत,गटसमन्वयक परतेकी,केंद्रप्रमुख बडवाईक आदी उपस्थित होते. विलगीकरण केंद्रावर दिल्या जाणाऱ्या सुविधांचा आढावा घेत उपस्थित नागरिकांसोबत चर्चासुद्धा केली. गोंदिया पंचायत समिती क्षेत्रात एकूण 128 विलगीकरण केंद्रात 896 नागरिकांना राहण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यात 832 पुरुष 45 महिला आणि 19 बालकांचा समावेश आहे. पांजरा, कामठा, छिपिया इत्यादी विलगीकरण केंद्रांना भेट देऊन तेथील नागरिकांशी चर्चा करून तेथील समस्या जाणून घेतल्या. पांजरा येथील केंद्रावर भेटीदरम्यान पांजरा येथील सरपंच चेतन नागपुरे, डॉ. येडे उपस्थित होते.उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासाबाबत सरपंच चेतन नागपुरे यांना कुलरची व्यवस्था करण्याची सूचना केली. कामठा येथील केंद्रावर भेटीदरम्यान सरपंच निलेश कुंभरे, मिलन पाथोडे उपस्थित होते.