गोंदिया,दि.31 : राज्यात रेशन विक्रेत्यांचा २ संघटना आहेत. एका संघटनेच्या वतीने १ जूनपासून संप पुकारला आहे. या संपात गोंदिया जिल्ह्यातील संघटनांचा सहभाग नसल्याचा खुलासा रेशन व केरोसिन विक्रेता संघटनेचे अध्यक्ष योगराज रहांगडाले यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून केला आहे तसेच या बाबतचे निवेदन जिल्हा पुरवठा अधिकार्यांना देण्यात आला आहे.
विविध मागण्यांना घेऊन एका संघटनेने संप पुकारला आहे. मात्र कोरोनाचे संकट भयानक असल्याने व त्यातही शासन गरजू लाभार्थ्यांपर्यंत अन्नधान्य पोहचविण्यासाठी प्रयत्नशील आहे, तेव्हा आपले मानवी कर्तव्य समजून या संकट काळात संपावर जाण्याऐवजी नागरिकांना रेशन कसे वाटप होईल, यावर गोंदिया जिल्हा संघटनेचा भर असून या संपाशी आपले काहीही घेणे-देणे नसल्याचे संघटनेचे अध्यक्ष रहांगडाले यांनी सांगितले. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी जुन महिन्याच्या रेशनची उचल करून सामान्य रेशन तसेच मोफत तांदूळ, ताळ, एपीएल धान्य, विना कार्ड धारकांचे धान्य वाटप करावे असे ही आव्हान संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच या संपात गोंदिया जिल्हा शासकीय राशन व केरोसिन विक्रेता संघाचा कोणताही सहभाग नाही, या बाबतचे निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिले आहे.




