25.5 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ शासकीय निवासात राहूनही अधिकारी, कर्मचा-यांचे घरभाडे उचल

शासकीय निवासात राहूनही अधिकारी, कर्मचा-यांचे घरभाडे उचल

0
1560

सडक अर्जुनी,दि.31ः नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प अंतर्गत वनपरिक्षेत्र नागझिरा अंतर्गत सहवनक्षेत्र नागझिरा व कोसमतोंडी येथील काही अधिकारी व कर्मचारी शासकीय निवासात राहून घरभाडे उचल करीत असल्याचे प्रकार समोर आले आहे. नागझिरा क्षेत्रसहाय्यक व बीटगार्ड यांना राहण्यासाठी नागझिरा अभयारण्यात तीन कमरे नावाचे निवासस्थान असुन या कम-यात फक्त बीटगार्ड राहतात. कोसमतोंडी चे क्षेत्रसहायक तसेच नागझिरा क्षेत्रातील बीटगार्ड हे कोसमतोंडी येथील बीटगार्ड या निवासस्थानी राहतात.परंतु मागिल दोन वर्षांपासून क्षेत्र सहाय्यक तीन हजार रुपये तर बिटगार्ड चार हजार रुपये घरभाडे उचलत असल्याचे दिसून आले आहे. क्षेत्रसहायकाचे निवासस्थान जीर्ण झाले असुन बाथरुम व शौचालय जीर्ण अवस्थेत आहे, पावसाळ्यात पाणी गळत असते.आजच्या स्थितीत अनेक सोयीसुविधांचा अभाव असुन याची कोणत्याचप्रकारे दुरुस्ती झाली नाही.अशाच ठिकाणी राहुन दिवस काढावे लागतात अशी माहिती क्षेत्र सहाय्यक व बिटगार्डने दिली.