अर्जुनी/मोर,दि.04:- कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव व इतर आजाराच्यावेळी रुग्णांना रक्ताची गरज भासत असून महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा होत असल्याने शिवसेना पक्ष प्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रत्येक शिवसैनिकाला आपल्या शाखेमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन केले होते.त्या आवाहनाला पाठीबा देत तालुका शिवसेना अर्जुनी/मोर च्या सौजन्याने शिवसेना शाखा केशोरीच्यावतीने ग्रामीण रुग्णालयात लोकमान्य ब्लड बैंक गोंदियाच्या माध्यमाने रक्तदान शिबिराचे अयोजन करण्यात
आले.शारिरीक अंतर व योग्य स्वच्छता, आणि संचार बंदीच्या सम्पूर्ण नियमाचे पालन करीत तब्बल 43 लोकांनी शिबिरात रक्तदान केले. या प्रसंगी शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष शैलेश जायसवाल,जिल्हा सचिव संजयसिंह पवार,तालुका प्रमुख अजय पालिवाल, तालुका संघटक चेतन दहिकर,युवासेना जिल्हा प्रमुख अश्विनसिंह गौतम, युवासेना तालुका अधिकारी अभिजित मसीद, कापगते,सुशील गहाने,नाना शेंडे,सुधाकर बोरकर,भारत गहाने,विलाश दर्रे, बगाजी वलथरे, राजेन्द्र ऊके,इत्यादि प्रामुख्याने उपस्थित होते.





