26.1 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ पारधी प्रकरणात पोलीस अधिक्षकांना भेटले पत्रकारांचे शिष्टमंडळ

पारधी प्रकरणात पोलीस अधिक्षकांना भेटले पत्रकारांचे शिष्टमंडळ

0
456

गोंदिया,दि.08ः-विविध युटूब चॅनलकरीता काम करणारे पत्रकार व छायाचित्रकार सतिश पारधी यांच्या घरासह मुलाच्या घरावर 4 जून च्या रात्री 12 वाजेच्या सुमारास पोलिसांच्या एका पथकाने अचानक भेट देत दिलेल्या मानसिक त्रासाबद्दल आज सोमवारला(दि.08) विविध प्रसारमाध्यमांच्या पत्रकारांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधिक्षकांची भेट देत निवेदन सादर केले.यावेळी विविध युटूब चॅनलकरीता काम करणारे पत्रकार व छायाचित्रकार सतिश पारधी यांच्यासह मुकेश सरकार,नवीन अग्रवाल आनंद मेश्राम,आकाश वालदे,अंकेश तिवारी,दत्ता गजभिये,संजू बापट आदी पत्रकारांचा शिष्टमंडळात समावेश होता.पोलीस अधिक्षकांना झालेल्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले.यावेळी निवेदनात रामनगर पोलीसासंह रात्रीला आलेल्या 7 ही पोलीस कर्मचार्यांना निलबिंत करण्याची मागणी करण्यात आली आहे.