27.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ कोविड रुग्णालयाच्या कामाची पालकमंत्री यांच्याकडून पाहणी

कोविड रुग्णालयाच्या कामाची पालकमंत्री यांच्याकडून पाहणी

0
203

बुलढाणा दि. १२ : : येथील स्त्री रुग्णालयाच्या इमारतीत कोविड १९ रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे. सदर रुग्णालयाचे अत्याधुनिकीकरण करून त्याठिकाणी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी टाटा ट्रस्ट, मुंबई यांनी घेतली असून टाटा ट्रस्टने प्रत्यक्षात कामास देखील सुरुवात केली आहे. या कामाची पाहणी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केली असून सदर काम हे ३० जून पर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना संबंधित यंत्रणेला त्यांनी दिल्या आहेत.

तसेच याठिकाणी रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांना राहण्याची व्यवस्था करण्यात यावी, येथील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना चांगल्या दर्जाचे जेवण योग्य किमतीत उपलब्ध व्हावे यासाठी कँटिंगची सुद्धा व्यवस्था करण्यात यावी, त्याचप्रमाणे १०० बेडच्या या रुग्णालयात अगोदर आयसीयुचे १० बेड निर्माण करण्यात येणार होते. त्याऐवजी २० बेड निर्माण करण्यात यावे अशा सूचना यावेळी पालकमंत्री यांनी टाटा ट्रस्टच्या अधिकाऱ्यांना व जिल्हा आरोग्य यंत्रणेला दिल्या. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रेमचंद पंडित,  टाटा ट्रस्टचे श्री. लोणारे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.