28.7 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ आज आणखी एका कोरोना बाधित रुग्णाची भर;27 अहवाल प्रतीक्षेत

आज आणखी एका कोरोना बाधित रुग्णाची भर;27 अहवाल प्रतीक्षेत

0
852

गोंदिया दि.13 (जिमाका) जिल्ह्यात आज आणखी एक नवा कोरोना बाधित रुग्ण आढळुन आला.तपासणी केंद्रातून आज 13 जून रोजी प्राप्त चाचणी अहवालावरून हा रुग्ण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले.हा रुग्ण 30 ते 40 वर्ष वयोगटातील असून तो तिरोडा तालुक्यातील आहे.जिल्ह्यात आता क्रियाशील बाधित रुग्णांची संख्या आता दोन झाली.जिल्हा तीन दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झाला होता.दुबई येथून दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींपैकी सलग दुसरा रुग्ण बाधित आढळला आहे.

जिल्ह्यात 26 मार्चला एक रुग्ण,19 मे रोजी दोन रुग्ण, 21 मे रोजी सत्तावीस रुग्ण , 22 मे रोजी दहा रुग्ण, 24 मे रोजी चार रुग्ण, 25 मे रोजी चार रुग्ण, 26 मे रोजी एक रुग्ण, 27 मे रोजी एक रुग्ण, 28 मे रोजी 9 रुग्ण, 29 मे तीन रुग्ण,30 मे रोजी चार रुग्ण,31 मे रोजी एक रुग्ण,2 जून रोजी दोन ,12 जून रोजी एक रुग्ण आणि आज 13 जून रोजी एक रुग्ण असे एकूण 71 रुग्ण आतापर्यंत कोरोना बाधित आढळून आले .

2 जून ते 11 जून या नऊ दिवसाच्या कालावधीत नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नव्हता.आज अकराव्या दिवशी आणखी एक रुग्ण आढळून आल्यामुळे कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया जिल्हयात पुन्हा एक कोरोना बाधित रुग्णाची भर पडली आहे.

जिल्ह्यातील 1211 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असता त्यामध्ये 71 रुग्ण कोरोना बाधित आढळले. अद्याप 27 नमुन्यांचा चाचणी अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेच्या तपासणी केंद्रात प्रलंबित आहे.

जिल्ह्यातील सर्व 69 रुग्ण कोरोनामुक्त झाले.आज आणखी एक नवीन कोरोना बाधित रुग्ण मिळाल्याने जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 71 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहे.जिल्ह्यात आता दोन क्रियाशील कोरोना बाधित रुग्ण आहे.जिल्ह्यातील विविध शाळा व संस्थांमध्ये 1256 आणि घरी 1529 असे एकूण 2885 व्यक्ती अलगीकरणात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ श्याम निमगडे यांनी दिली.