26.4 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ शिवालय कंस्ट्रक्शन कंपनीमुळे सर्रा-शिवनटोला मार्गावर वन्यप्राण्यांचे जिव धोक्यात

शिवालय कंस्ट्रक्शन कंपनीमुळे सर्रा-शिवनटोला मार्गावर वन्यप्राण्यांचे जिव धोक्यात

0
290

गोंदिया,दि.13ः- नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत शिवालय कन्स्ट्रक्शन कँपनी दिल्लीला अडयाळ- माडगी- वडेगाव- बिरसी- तिरोडा रस्ता दुरुस्तीचे कंत्राट सार्वजनिक बांधकाम विभाग गोंदियाकडून काही अटीशर्तीवर देण्यात आले.मात्र कंत्राटदार कंपनीने त्या अटीशर्तींना ठेंगा दाखविल्याने या मार्गावर वन्यजीवासंह मानवांचेही अपघाताचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे.सदर रस्त्याची दुरुस्ती करतांना प्रत्येक 200 मीटर अंतरावार गतिअवरोधक तयार करण्यात येईल त्यानंतरच पुढच्या 200 मीटरचे बांधकाम हाती घेण्यात येईल असे स्पष्ट निर्देश उपविभागीय अधिकारी यांना मंजुरी देताना दिले आहेत.मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्याने व अभियंत्याने त्याकडे चक्क कानाडोळा केल्याने वन्यजिवांचे सरक्षणंच धोक्यात आले आहे.हा मार्ग व्याघ्र प्रकल्पातून जात असल्याने 20 किमी प्रती वेग निर्धारीत करण्यात आलेले आहे.मात्र गतीअवरोधकच नसल्याने वाहनचालक भरधाव वेगाने 80-90 च्या वेगाने जात असल्याने वन्यजीवांसोबत अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.31 मे व 6 जून रोजी झालेल्या अपघातात महिलेसह दोघे जखमी झाले आहेत.तर आज 13 जून रोजी याच मार्गावर भरधाव चारचाकी वाहनामुळे एका वानराचा अपघात होऊन गंभीर जखमी झाल्याची घटना चोरखमारा टि प्वाईंटसमोर घडली आहे.