28.8 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : शिल्पा सोनाले

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : शिल्पा सोनाले

0
873

अर्जुनी मोरगाव,दि.15 :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या समोर आली होती. मात्र आरोग्य सेवेच्या उत्तम कामगिरीमुळे लवकरच त्यावर मातही केली. सध्या तालुक्यात कुठलाही कोरोना बाधित रुग्ण नाही त्यामुळे अर्जुनी मोरगाव येथील मुख्य मार्वेâट चार दिवस सुरू राहत आहे. इतर गावात कुठल्याही प्रकारचे दुकान पेट्रोल पंप दुकान बंद नाहीत.त्यामुळे नागरिकांनी अशा कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये, अशी माहिती उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी दिली आहे.
स्थानिक नगरपंचायतच्या आदेशानुसार अर्जुनी शहरात मंगळवार ते शुक्रवार मार्केट सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत सुरू असतील, तालुक्यातील इतर ठिकाणी हे दुकाने सुरू आहेत. सध्या कोरोणाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात सौम्य प्रमाणात आहे अर्जुनी मोरगाव येथे जिल्ह्यातून सर्वाधिक रुग्ण निघूनही सर्व रुग्ण बरे झाले आहेत. तरी तालुक्यात खबरदारीच्या सूचना प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जात आहेतच मात्र काही समाज कंटकाकडून अफवा पसरवण्याचे काम नागरिकांमध्ये करून जनतेला वेठीस धरण्याचे काम सुरूच आहे याआधी मिठाबाबतच्या अफवा पसरविण्यात आल्या होत्या. यामध्ये सामान्य नागरिकांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला होता. तशाच पद्धतीची अफवा पेट्रोल पंप बंद असणार अशी पसरवला गेली आहे. ही अफवा पूर्णतः खोटी असून यावर जनतेने विश्वास ठेवू नये प्रशासनाकडून दिल्या गेलेल्या नियमाचे व आदेशाचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी केले आहे.