25.2 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ खरीप धानाचे बोनस आणि रब्बीचे चुकारे तात्काळ अदा करा – आ. विनोद...

खरीप धानाचे बोनस आणि रब्बीचे चुकारे तात्काळ अदा करा – आ. विनोद अग्रवाल

0
158
गोंदिया,दि.18ःसध्या  जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असून अद्याप धान खरेदी पूर्ण झालेली नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी करण्याची मुदत संपत असली तरी पावसाने हजेरी लावल्याने धान खरेदी पूर्ण झालेली नाही. पूर्णपणे शेतकऱ्यांचे धानाची उचल झालेली नाही. शेतकऱ्यांचे धान अद्याप उघड्यावर असल्याने पावसाच्या पाण्यात भिजून पाण्याची नासाडी होत आहे. त्यातून कित्येक शेतकरी हवालदिल झाले आहेत. धान उचल करण्याची मुदत वाढवून ३१ जुलै पर्यन्त करण्यात यावी अशी मागणी आमदार विनोद अग्रवाल यांनी केली आहे. तसेच खरीप हंगामातील उर्वरित 140 कोटी रुपये बोनस रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नसल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या हक्काचे बोनसची रक्कम तात्काळ अदा करण्यात यावी अशीही मागणी यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांनी केली आहे. रब्बी धानाचे जवळपास 170 कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने रब्बी धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना ही आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. काही दिवसात नवीन खरीप हंगामाची पीक पेरणी सुरू होणार असून शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता असणार आहे. त्यामुळे त्यांना कर्ज घेण्याची वेळ आलेली आहे. करिता शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या मालकीचे पैसे अदा केल्यास त्यांचे पैसे त्यांना त्यांची शेती करण्यास उपयोगी पडून कर्ज घेण्याची आवश्यकता पडणार नाही असेही आमदार विनोद अग्रवाल यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांना सुचवले आहे. खरीप धानाचे बोनस आणि रब्बी धानाचे चुकारे तात्काळ शेतकऱ्यांना अदा करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.