25.2 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ नाभिक समाजाच्या व्यावसायिकांना आर्थिक मदती द्या

नाभिक समाजाच्या व्यावसायिकांना आर्थिक मदती द्या

0
81

अर्जुनी मोरगाव,दि.18 : कोरोना कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे नाभिक समाजाच्या बांधवांना सलून व्यवसायापासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे मोठया प्रमाणात आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. आर्थिक नुकसान शोषणार्‍या या समाजाच्या बांधवांना आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर करुन दिलासा द्यावा, अशी मागणी येथील नाभीक समाज संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात निवेदनही देण्यात आले आहे.
कोरोना विषाणू पार्श्वभुमीवर संचारबंदी लागु करण्यात आली आहे. शासन, प्रशासनाने मार्गदर्शन सुचना व अटी-शर्तीच्या अधिन राहून नागरिक व व्यवसायिकांना सवलत दिली आहे. परंतु, नाभिक समाजाप्रती उदासीनता दाखविण्यात आली. त्यामुळे नाभिक समाजाच्या बांधवांना व्यवसायापासून वंचित रहावे लागत आहे. यामुळे नाभिक समाजावर आर्थिक संकट कोसळले असून पारंपारिक व्यवसायावर अवलंबून उदरनिर्वाह कसे करावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नाभीक समाजाच्या व्यावसायिकांसाठी राज्य सरकारकडून योग्य आर्थिक मदतीचे पॅकेज तातडीने जाहीर करावे. गेल्या तीन महिन्यांपासून दुकाने बंद असून रोजगार ठप्प आहे करीता दुकान मालकाचे वीज बिल माफ करावे, घरमालकाला घरभाडे देण्यासाठी तसेच कुटुंबियांचा उदरनिर्वाह करण्यासाठी आर्थिक मदत द्यावी, कारागिरांना ७ हजार व दुकान मालकांना १० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नवेगावबांध येथील नाभीक समाज संघटनेने केली आहे. या संदर्भात तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. यावेळी नाभीक समाज संघटनेचे दादाजी कावळे, लेमराज सूर्यवंशी, सुनील उरकुडे, किशोर दाणे, मंगेश दाणे, जितेंद्र बानक, प्रशांत कावळे, अजय सूर्यवंशी, अश्विन उरकुडे, हिम्मत सूर्यवंशी, चंद्रकांत उरकुडे, श्रीकांत सुर्यवंशी उपस्थित होते.