24.9 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ भंडारा जिल्ह्यात आज13 पॉझिटिव्ह

भंडारा जिल्ह्यात आज13 पॉझिटिव्ह

41 व्यक्तींची कोरोनावर यशस्वी मात; कोरोना बाधितांची संख्या 71; क्रियाशील रुग्ण 30

0
1417

भंडारा दि.19 (जिमाका) जिल्ह्यात आज 13 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पवनी येथील 7, भंडारा 3, तुमसर 2 व लाखनी येथील 1 रुग्ण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 41 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्ह्यात आता 30 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या 71 एव्हढी झाली आहे.
नागपूरच्या विषाणू चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या स्वॅबचा अहवाल आज 19 जून रोजी प्राप्त झाला असून आज 13 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या 71 इतकी झाली असून यामध्ये क्रियाशील रुग्ण 30 आहेत तर 41 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.
आतापर्यंत 3309 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.त्यापैकी आतापर्यंत 71 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर 3135 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 103 नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.
आज 19 जून रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये 24 व्यक्ती भरती असून आतापर्यंत 414 व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोविड केअर सेंटर साकोली, तुमसर व मोहाडी येथे 530 भरती आहेत. 2333 व्यक्तींना रुग्णालय क्वारंटाईन मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे, मुंबई व इतर राज्यातून 42942 व्यक्ती भंडारा जिल्ह्यात आले असून 37377 व्यक्तींचा 28 दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच अन्य ठिकाणाहून आलेल्या 5565 व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांनी घरामध्येच रहावे, घराबाहेर पडू नये अशा सक्त सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.