गोंदिया,दि.२०ः गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी जिल्हा परिषदेला ग्रामीण भागातील विकासाकरीता ७.५० कोटी रुपयाच्या कामाचे सादर केलेल्या नियोजनातून ५ कोटी २२ लाख रुपयाच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यातील ५ हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीला नागरी सुविधा योजनेंतर्गत ७.५० कोटीमधून ५.२२ कोटी रुपयाची मंजुरी दिली.यात कुडगा ग्रामपंचायत ४० लाख,खमारी ५३ लाख,नागरा ६० लाख,काटी २८ लाख,कटगींकला ४६ लाख,फुलचूरटोला ५१ लाख,फूलचूर ६७लाख,कामठा ४४ लाख,कारंजा ४९ लाक,एकोडी ३५ लाख असे ५.२२ कोटीच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.निधी मंजुर करुन दिल्याबद्दल माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांचे जिल्हा परिषद अध्यक्ष,जिल्हा परिषद शिक्षण सभापतीसह जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्यांनी त्यांचे आभार मानले आहे.





