24.9 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन ११ दिवसानंतरही सुरूच

कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन ११ दिवसानंतरही सुरूच

ग्रामीण आरोग्य व्यवस्था कोलमडली रुग्णालय पडली ओस

0
225

अर्जुनी मोरगाव,दि.21ःअनेक वर्षापासून आपल्या विविध मागण्या शासनापुढे ठेवून वेळोवेळी निवेदन,मोर्चे,धरणे, या आंदोलनांच्या माध्यमातून शासनाकडे न्याय्य मागण्या मागणारे आरोग्य कंत्राटी आरोग्य कर्मचारी 11 जून पासून संपावर असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था विस्कळीत झालेली आहे.जो पर्यंत मागण्या मान्य होणार नाही तो पर्यंत मागे हटणार नाहीआंदोलन सुरूच राहील अशी भूमिका घेत तसे निवेदन उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले अर्जुनी मोरगाव यांच्या मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना देण्यात आले.

राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी व आरोग्य सेवा कर्मचारी संघटना यांच्या समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली ‘शासन सेवेत घेण्यात यावे,रिक्त जागी समकक्ष पदावर समायोजन करण्यात यावे,समान काम समान वेतन देण्यात यावे.या मागण्यांना घेऊन शासनाशी वाटाघाटी करण्याचे काम मंत्रालय स्तरावर सुरू आहेत मात्र अजूनही ही तोडगा निघालेला नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांवर दबाव आणून कामावर रुजू होण्याचे आदेश दिले होते मात्र या आदेशाला कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कुठलीही भीक घातली नाही उलट त्यांचे 11 जून पासून सुरू झालेल आंदोलन आज 11 दिवसांनंतरही ही अविरतपणे सुरु आहे.न्याय मिळत नसल्याने अखेर या कर्मचाऱ्यांनी टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचं ठरवलं सुरुवातीलाच सौम्य असणारा हे आंदोलन आत्ता मात्र अधिकच आक्रमक झालेल आहे.जोपर्यंत न्याय मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत मागे हटणार नाही ही अशी भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी, खंड विकास अधिकारी, तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.झामेश गायकवाड,रेखा पुराम हिना वावरे,शेंडे,मोहनकर  संघटनेचे सदस्य उपस्थित होते.