27.4 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ लाकडाउन काळातील विज बिल माफ करा: भाकपची मागणी

लाकडाउन काळातील विज बिल माफ करा: भाकपची मागणी

0
571

गोंदिया,दि.२४-कोरोणा (कोव्हिड-19) या साथीच्या रोगामुळे लाकडाउन घोषित झाल्यानंतर उद्भभवलेल्या परिस्थितीत विज देयकांचा भरणा करण्यालायक विज ग्राहकांची आर्थिक स्थिती नसल्याने मार्च-एप्रिल- मे व जुन या महिण्याचे विज बिल माफ करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पार्टी गोंदिया जिल्हा कौंसील ने राज्याचे मुख्यमंत्री,उर्जा मंत्री,विज वितरण कंपनी चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तसेच उर्जा खात्याचे प्रधान सचिव यांचेशी केली आहे. पक्षाचे सचिव का. मिलिंद गनविर यांनी पाठविलेल्या निवेदनात नमुद केल्या प्रमाणे एकुणच लाकडाऊन काळातील बिल माफ करणे बाबत पक्षाने दि.२७ एप्रिल ला पण या आशयाचे निवेदन प्रेषित केले होते.२४ मार्चला लाकडाउन घोषित झाल्यानंतर शासनाचे व खासगी सर्वच प्रकारचे व्यवहार बंद पड़ले आहेत परिणामी विज वापराचे रिडींग झाले नाही किंवा बिल तयार झाले नाही आणि लाॅकडाउन झाल्यानंतर आता मीटर रिडींग करण्यात येत असून कदाचित ३-४ महिण्याचे वित्त बिल एकत्र दिले जात आहे. पक्षाने नमुद केले आहे की लाॅकडाउनमुळे सर्व व्यवहार बंद पड़ले,मजुरांचे काम गेले,लहान व्यावसायिकांचे व्यवसाय बंद पड़ले अशा प्रकारे या वर्गावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. शासनाने काही धान्य मोफत वाटून किंवा ५००रू.जनधन खात्यात टाकून (जे बहुसंख्य लोकांना मिळाले नाही)मदत करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला वास्तविक शासनाचेने सरळ नगद मदत संकटग्रस्त लोकांना करावयास पाहिजे होती. केंद्र सरकारचे पॅकेज म्हणजे कर्ज मोहिम होय अशा वेळी ह्या संकटग्रस्त जनतेवर एकमुश्त विज बिल आकारणे म्हणजे सरकारी अमानवियतेचा कळसच म्हणावे लागेल . विज वितरण कंपनीच्या अंदाजानुसार विद्युत देयके पाठविल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर विज ग्राहकांमध्ये असंतोष पसरलेला आहे व हि देयके आर्थिक संकटात सापड़लेली जनता भरण्यास असमर्थ आहे अशा या गंभीर प्रश्नांवर विज वितरण कंपनी व शासनाच्या अशा धोरणामुळे त्रस्त झालेली जनता व भारतीय कम्युनिस्ट पक्ष सध्यातरी लाॅकडाउन काळातले मार्च,एप्रिल,मे व जून या महिण्याचे घरगुती,व्यावसायिक व कृषी विषयक विज बिल पुर्णतः माफ करण्याच्या मागणीसाठी येत्या काळात मोठे आंदोलन करणार असल्याची सुचना भारतीय कम्युनिस्ट पक्ष गोंदिया जिल्हा कौसिंल चे सचिव मिलिंद गणविर यांनी निवेदनाच्या माध्यमातून वरिष्ठांना दिली आहे.