31 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ आमदाराने सुनावले बॅंकांना…पीककर्ज वाटपात निष्काळजीपणा नको

आमदाराने सुनावले बॅंकांना…पीककर्ज वाटपात निष्काळजीपणा नको

0
213

गोंदिया,दि.26ः जिल्ह्यात मॉन्सूनचे आगमन झाले आहे. रोवणीपूर्व शेतीची कामे सुरू झाली आहेत. अशावेळी शेतकरी पीककर्ज घेण्यासाठी राष्ट्रीय, खासगी, सहकारी तसेच विविध बॅंकांकडे अर्ज करीत आहेत. परंतु, पीककर्जासाठी अधिकाऱ्यांकडून आडमुठेपणाचे धोरण अवलंबिले जात आहे. यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत आमदार विनोद अग्रवाल यांनी पीककर्ज वाटपात निष्काळजीपणा खपवून घेणार नाही, असा इशारा देत बॅंक अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.येथील पंचायत समिती कार्यालयात बुधवारी (दि. 24) पीककर्ज वाटपासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला विविध  जिल्हा अग्रणी बॅंकेचे प्रबंधक, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा मध्यवर्ती बँक, विविध बँकांचे शाखा व्यवस्थापक,तहसीलदार राजेश भांडारकर, जि.प. सदस्य ,कमलेश सोनवाने, सरपंच चेतन बहेकार,बाळू बिसेन,प्रकाश सेवतकर,किशोर दुबे,विक्की बघेले उपस्थित होते.

बॅंकांनी किती रुपयांचे कर्ज वाटप केले, यापेक्षा किती शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ मिळाला. किंबहुना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी काम करण्याची गरज असल्याचे मत आमदार अग्रवाल यांनी व्यक्त केले. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा असून, पीककर्ज वाटप न करणाऱ्या बॅंक अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.दरम्यान, किती रुपयांचे कर्ज वाटप केले, यापेक्षा किती शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ मिळाला. किंबहुना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी काम करण्याची गरज असल्याचे मत आमदार अग्रवाल यांनी व्यक्त केले. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा असून, पीककर्ज वाटप न करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.तालुक्‍यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे 2 हजार 281 व व्यापारी बॅंकेचे 1 हजार 833 अशा एकूण 4 हजार 114 लाभार्थ्यांना खरीप पीककर्जाची गरज आहे. आतापर्यंत फक्त 322 शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात आले, यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच उर्वरित उद्दिष्ट 30 जूनपर्यंत पूर्ण करण्यासंबंधी सूचनादेखील बॅंकांना केल्या. सोबतच उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजना बॅंकांना सुचविल्या.विविध राष्ट्रीय बॅंकांनीदेखील आपले टार्गेट वेळेत पूर्ण करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पीककर्जाचा लाभ मिळवून देण्याचे व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त योजनेचा लाभ घेत कृषी पीककर्ज घेऊन कृषी उत्पादन वाढविण्याचे आवाहन आमदार अग्रवाल यांनी उपस्थित बॅंकांच्या प्रतिनिधी व शेतकऱ्यांना केले आहे.शेतकऱ्यांना पीककर्ज घेतेवेळी आपण दुसऱ्या बॅंकेत थकबाकीदार नसल्याचे नाहरकत प्रमाणपत्र संबंधित बॅंकेत कर्ज घेताना द्यावे लागते. मात्र नाहरकत प्रमाणपत्र मिळवताना शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत होता. म्हणून शेतकऱ्यांनी 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हलफनामा द्यावा की त्यांच्याकडे कुठल्याही बॅंकेची कसल्याही प्रकारची थकबाकी नाही, असा हलफनामा दिलेल्या शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारच्या ना हरकत प्रमाणपत्राची गरज भासणार नसल्याचे आढावा बैठकीत स्पष्ट करण्यात आले.