१२ जुलै रोजी पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडणूक

0
9

पिठासीन अधिकारी नियुक्त
गोंदिया, दि.६ : जिल्हयातील ८ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणूकीसाठी पिठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी एका आदेशाद्वारे केली आहे. संबंधित पंचायत समितीच्या सभागृहात १२ जुलै रोजी दुपारी २ वाजता पुढील अडीच वर्षाच्या कालावधीकरीता सभापती व उपसभापती पदाची निवडणूक होणार आहे. पिठासीन अधिकारी, संबंधित पंचायत समिती आणि पंचायत समिती सभापती पदाचा आरक्षित प्रवर्ग पुढीप्रमाणे. गोंदिया तहसीलदार संजय पवार ह्न पंचायत समिती गोंदिया ह्न नागरिकांचा मागास प्रवर्ग(महिला), देवरी उपविभागीय अधिकारी सुनिल सूर्यवंशी ह्न पंचायत समिती देवरी ह्न अनुसूचित जमाती (महिला), जिल्हा नियोजन अधिकारी बकुलजी घाटे ह्न पंचायत समिती गोरेगाव ह्न सर्वसाधारण, तिरोडा उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे ह्न पंचायत समिती तिरोडा ह्न नागरिकांचा मागास प्रवर्ग, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर ह्न पंचायत समिती अर्जुनी मोरगाव ह्न सर्वसाधारण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) राजकुमार पुराम ह्न पंचायत समिती सालेकसा ह्न सर्वसाधारण, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत काळे ह्न पंचायत समिती आमगाव- सर्वसाधारण(महिला) व उपजिल्हा निवडणूक अधिकारी विलास ठाकरे ह्न पंचायत समिती सडक अर्जुनी ह्न सर्वसाधारण (महिला) असा आहे.