शिक्षक सोसायटीवर संघाच्या परिवर्तन पॅनलचा विजय

0
11

गोंदिया ,दि.७, प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था गोंदियाच्या निवडणुकीत १३पैकी ९ जागा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या परिवर्तन पॅनलने मिळविल्या.
जिल्हास्तरावर इतर मागासवर्गीय गटातून विरेंद्रकुमार कटरे, अनुसूचित जाती जमाती गटातून नागसेन भालेराव, विमाप्र/भज गटातून पवन कोहळे, महिला प्रवर्गातून ओमेश्‍वरी बिसेन, सुमिधा गजभिये, गोंदिया तालुक्यातून एस.यू.वंजारी, गोरेगाव तालुक्यातून शंकर चव्हाण, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातून वाय.एस. मुंगुलमारे हे विजयी झाले.समितीच्या सहकार पॅनलला चार जागा मिळविता आल्या.
यात आमगाव येथून निलकंठ बिसेन, सडक-अर्जुनीतून किशोर डोंगरवार, देवरी येथून संदिप तिडके व तिरोडा येथून प्रदिप रंगारी विजयी झाले. यापूर्वी शिक्षक सोसायटीवर शिक्षक समितीच्या पॅनलचे वर्चस्व होते.