.. अखेर रस्ता बांधकामाला सुरुवात

0
12

गोंदिया दि.१0: बाजपेई चौक ते र्मुी रेल्वे चौकी पर्यंतचा रस्ता तयार करण्यासाठी सुरू असलेल्या र्मुीरोडवासी व प्रशासनाच्या लढय़ात अखेर र्मुीरोड वासीयांचा विजय झाला. बुधवारपासून (दि.८) रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली असून येत्या दिवाळी पर्यंत या रस्त्याचे बांधकाम पूर्ण करणार असल्याचे आश्‍वासन कंत्राटदाराने दिले आहे.
बाजपेई चौक ते र्मुी रोड पर्यंतच्या रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे. त्यात रस्त्यावर पालिकेने दुभाजक तयार केल्यामुळे रस्ता अरूंद झाला. उखडलेल्या रस्त्यावरून ये-जा करणे येथील नागरिकांच्या नशिबी आले. त्यामुळे रस्त्याची त्वरीत दुरूस्ती व्हावी तसेच रस्त्यावर असलेले विद्युत पोल हटवून रस्ता रूंदीकरण करण्याची मागणी येथील नागरिकांनी उचलून धरली होती.
यासाठी त्यांनी नेत्यांची मदत न घेता थेट जिल्हाधिकार्‍यांना गाठून त्यांना निवेदन देत सतत मागणीचा पाठपुरावा केला होता. तर रस्त्यासाठी आंदोलनही केले होते. त्यांच्या मागणीकडे लक्ष देत जिल्हाधिकार्‍यांनी स्वत: पाहणी करून रस्ता दुरूस्तीचे आदेश संबंधीत विभागाला दिले होते. त्याला काही उशीर लागला मात्र उशीरा का होईना र्मुीरोडवासीयांचा विजय झाला व रस्ता बांधकामाला बुधवारपासून (दि.८) सुरूवात झाली. या रस्त्याचे काम तिरोड्याचे कंत्राटदार असाटी यांना देण्यात आल्याची माहिती आहे. बुधवारपासून त्यांनी तीन जेसीबी लावून रस्त्यावरील माती उचलण्यास सुरूवात केली आहे. चार टप्यात हे काम होणार असून येत्या दिवाळीपर्यंत रस्ता पूर्णपणे तयार होणार असल्याची माहिती आहे.