मोदी लाटेवर स्वार भाजपचा डोंगा जि.प.निवडणुकीत पलटला

0
9

खेमेंद्र कटरे
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला भरभरून साथ दिलेल्या गोंदिया-भंडारा जिल्हावासियांनी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला ‘अच्छे दिनङ्कची भेटच जनुकही पराभवाच्या झटक्याने दिली.तत्कालीन आघाडी सरकारने विकासकामे न केल्यामुळे त्यांना जसा लोकसभा व विधानसभेत धडा शिकविला तसाच धडा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत ओबीसी,बहुजन समाजातील शेतकरी,शेजमजुर,विद्यार्थी मतदारांनी भाजपला शिकवून आम्हीच ‘राजेङ्क असल्याचे दाखवून दिले.
लोकसभेच्या निवडणुकीत अच्छे दिन चे गाजर दाखवीत लाखोच्या मताधिक्याने भाजपला qजकवून दिलेल्या जनतेने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मात्र लोकसभेच्या पराभवानंतरही सतत संपर्कात राहणाèया प्रफुल पटेलांच्या राष्ट्रवादीला चांगलीच साथ दिली.त्यातही भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीयमंत्री नितीन गडकरी,प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे,राज्यमंत्री आदींनी झंझावती प्रचारदौरा केला.मात्र ज्या ज्या ठिकाणी यांच्या सभा झाल्या त्या तालुक्यातून भाजपचा सफायाच झालेला आहे.उलट राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा एकट्याने प्रफुल पटेलांनी सांभाळली.
गोंदिया भंडारा जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात त्यांनी प्रचारसभा घेऊन राज्य व केंद्रसरकारच्या अपयशाचे पाढे वाचले.ज्या भाजपने सत्तेत येण्यापूर्वी धानाला हमीभाव,बोनस देण्याची घोषणा केली.सत्तेत येताच हमीभाव देण्यास विसरले.ओबीसीच्या शिष्यवृत्तीवर आणि नॉन क्रिमिलेयरवर आंदोलने केली त्याच ओबीसी समाजाच्या विद्याथ्र्यांच्या १०० टक्के परतावा शिष्यवृत्तीचा प्रश्न रेंगाळत ठेवला.तत्कालीन सरकारने नॉन क्रिमीलेयरची मर्यादा सहा लाख वाढवून ठेवली त्याचे शासन निर्णय सुध्दा जून महिन्यात काढू शकले नाही.अशा अनेक प्रकारे ओबीसी साठी लढण्याचे सोंग करणाèया भाजपने सत्तेत येताच ओबीसींची थट्टा केल्याने ओबीसी समाजातील शेतकरी,शेतमजुरांनी मतदानाच्या माध्यमातून धडा शिकविला.
गेल्या वेळी गोंदिया/भंडारा जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाèया १३ पंचायत समितीमध्ये एकहाती सत्ता मिळविणाèया भाजपला यावेळी मतदारांनी अध्र्यापेक्षाही कमी जागा मिळू दिल्या नाहीत.
शेतकèयांचा मुद्दा घेऊन आत्तापर्यंत शेतकèयांसह सामान्य जनतेची सहानुभूती मिळविलेल्या खासदार नाना पटोले आणि मोदी लाटेवर स्वार होऊन निवडून आलेले राजकुमार बडोले,विजय रहागंडाले,चरण वाघमारे, बाळा काशीवार,संजय पुराम, रामचंद्र अवसरे या आमदारद्वयींना ग्रामीण मतदारांनी चांगलाच धडा शिकविला.विशेष म्हणजे राज्याचे सामाजिक न्याय मंत्रिपद गोंदिया जिल्ह्याला देऊनही या जिल्ह्यातील ओबीसींच्या समस्या मात्र कायम जशा होत्या तशाच राहिल्या.बार्टीच्या माध्यमातून निवडणुकीच्या तोंडावर घेतलेल्या रोजगार कार्यशाळेचा लाभही रोजगारांना मिळू शकला नव्हता.सामाजिक न्यायमंत्र्यानेही पालकमंत्रीपदाचा योग्य तो लाभ या जिल्ह्याला द्यायला हवा होता,तो न देता पक्षीय राजकारणातील भांडणात कार्यकत्र्यांना विसरले होते.
हवेत राहू नका, जनतेची कामे करा, असाच संदेश मतदारांनी दिलेला आहे. निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधी हे पक्षाचे नसून सर्व जनतेचे असल्याची जाणीव विसरून विरोधासाठी विरोध करून सामान्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी ताकद उभी न करता विरोधातच वेळ खर्ची घालण्याचे काम दोन्ही जिल्ह्यातील आमदारांनी केले आहे.त्यातच गोंदिया जिल्ह्यात तर भाजप संघटनमंत्र्याने या आपसी विरोधाची पाळेमुळे एवढी खोलवर रुजविली की भाजपचा कुठलाही आजी माजी आमदार आजच्या घडीला कुणालाच मोजायला तयार नसल्यामुळे भाजपवर ही वेळ आल्याची चर्चा आहे.भाजपने महादेवराव शिवणकरांना ज्या पद्धतीने डावलले त्याचा फटका या निवडणुकीत सुध्दा दिसून आला.एकट्या गोंदिया जिल्ह्यात शिवणकर पुत्र विजय शिवणकरामुळे आमगावच्या ४,तिरोडा १,अर्जुनी मोरगाव १,सडक अर्जुनी १ अशा ७ जागावर भाजपला फटका सहन करावा लागला आहे.तिरोड्यात भाजप सोडून गेलेल्या पंचम बिसेन यांनी सरांडी जि.प.व पं.स.आपल्या ताब्यात घेऊन भाजपची जागा हिसकावली.या निवडणुकीत शिवणकरांनी आपली बाजू जमेची ठेवत केशवराव मानकरांना मात्र पटकनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांनी दोन्ही जिल्ह्यात ८० च्या जवळपास झंझावती प्रचारसभा घेऊन मतदारसंघ पुन्हा पिंजून काढला. मागीलवेळी केलेली चूक पुन्हा करू नका, अशी भावनिक साद मतदारांना घातली. मतदारांनीही भाईजींवरच्या प्रेमाला भरभरून साथ दिली. प्रत्येकच प्रचारसभेत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणावर सडकून टीका करीत ‘अच्छे दिनङ्क आले कां? असा सवाल विचारून मतदारांशी थेट संवाद साधला.
लोकसभेत नाकारल्यानंतरही कुठलाही पक्षनिभिवेश न ठेवता थेट लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्यांना हात घातला. मतदारांची ‘मनेङ्क आणि ‘मतेङ्क जिंकण्यात ते यशस्वी ठरले. राष्ट्रवादीच्या विजयाचे खरे शिल्पकार प्रफुलभाई ठरले असून जनतेने आपले प्रेम हे केवळ भाईंजीवरच असल्याचे दाखवून दिले आहे. आता त्यांना पक्षातील गटातटाचे राजकारण आणि पक्षातील व्यक्ती वर्चस्वाला आवर घालण्यासाठी लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.
भंडारा जिल्ह्यात काँग्रेसला जे यश मिळाले त्याचा खरा वाटा जिल्ह्याचे प्रभारी आमदार विजय वड्डेट्टीवार यांच्यासोबत माजी आमदार सेवक वाघायेंना जातो.तर गोंदिया जिल्ह्यात गोंदिया विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या आमदारांनी आपल्या जागा कायम ठेवण्यात यश मिळविले.भंडारा जिल्ह्यातील निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवून काँग्रेसने कधी नव्हे तेवढे यश मिळविले. माजी आमदार सेवक वाघाये हे काँग्रेसच्या विजयाचे खरे शिल्पकार ठरले आहेत.
ज्या साकोली विधानसभेचे दोनदा नेतृत्व आणि दोनदा मतदारांनी नाकारल्यानंतर ते पुन्हा जोमाने जनतेत गेले. या विधानसभा क्षेत्रात साकोली, लाखनी व लाखांदूर या तीन तालुक्यात जिल्हा परिषदेचे १८ गट आहेत. त्यापैकी १५ जागांवर निर्विवाद जागा जिंकून आपले नेतृत्व पुन्हा सिद्ध केले.याउलट गोंदिया तालुक्यात येणाèया १४ गटापैकी फक्त ६ जागा qजकून आणल्या.यावरून लोकसभेच्या दृष्टीने अग्र‹वालापेक्षा वाघाये हे काँग्रेसमध्ये वजनदार ठरले आहेत