23.5 C
Gondiā
Sunday, July 19, 2026
Home विदर्भ काँग्रेसचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

काँग्रेसचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

0
24

गोंदिया दि.१४: जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे यांच्या नेतृत्वात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रतिनिधी मंडळाने शुक्रवार (दि.१0) जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. तसेच जिल्ह्यातील शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमुक्ती देऊन त्यांचा सात-बारा कोरा करण्याची मागणी केली. जिल्हाधिकार्‍यांनी त्यांचे निवेदन त्वरित शासनाला पाठविण्याचे निर्देश दिले. निवेदनानुसार, मागील काही वर्षांपासून अवकाळी पाऊस व गरजेच्या वेळी दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. काँग्रेस सरकारने शेतकर्‍यांना सात हजार ५00 रूपये प्रति हेक्टरची मदत केली होती. मात्र भाजप सरकारने धानाचे भाव कमी केले व मदत काहीही केलेली नाही. शासनाने शेतकर्‍यांना कर्जमुक्ती देवून त्यांचा सातबारा कोरा करावे, अशी मागणी केली. या वेळी प्रतिनिधी मंडळात अशोक चौधरी, झामसिंह बघेले, गौतम, पृथ्वीपालसिंह गुलाटी, जहीर अहमद, देवेंद्र अग्रवाल, अमरचंद अग्रवाल, डेमेंद्र रहांगडाले, बलजित बग्गा, नगरसेवक पाथरू, सुशील ठवरे, आदी उपस्थित होते.