डोळस श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका-श्याम मानव

0
17

गोंदिया दि. १२: एखादी गोष्ट केल्याने त्याचे दुष्परिणाम येतील ती अंधश्रद्धा आहे. परंतु श्रद्धेपोटी केलेल्या कामातून वाईट परिणाम होणार नाही ती श्रद्धा आहे. डोळस श्रद्धा ठेवल्यास काही गैर नाही. परंतु अंधश्रद्धा ठेवणे हे चुकिचे आहे. डोळस श्रद्धा म्हणजेच विश्‍वास. विश्‍वासाने केलेल्या कामाचा परिणाम वाईट येत नाही, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक व राष्ट्रीय संघटक प्रा. श्याम मानव यांनी काढले.
कारंजा येथील पोलीस मुख्यालयात आयोजित जादूटोणा विरोधी कायद्यावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील पोलीस अधिकार्‍यांना जादूटोणा विरोधी कायद्याची माहिती व्हावी यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संघटक श्याम मानव यांची मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेला गोंदिया जिल्ह्यातील तसेच भंडारा जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, अज्ञानावर पोसल्या जाणार्‍या अनिष्ट व दुष्ट प्रथांपासून समाजातिल सर्व सामान्य लोकांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने आणि समाजातील सर्व सामान्य लोकांचे शोषण करण्याच्या व त्या द्वारे समाजाची घडीच विस्कटून टाकण्याच्या दुष्ट हेतूने भोंदू लोकांनी सर्वसामान्यांमध्ये जादूटोणा हा शब्द पसरविला. अलौकिक शक्तीच्या किंवा अधभुत शक्तिच्या किंवा भूत पिसाच्च यांच्या नावाने निर्माण झालेल्या नरबळी, इतर अमानुष, अनिष्ट, दुष्ट व अभोरी प्रथांचा मुकाबला करुन त्यांचे समुळ उच्चाटन करण्याच्या दृष्टिने समाजामध्ये जनजागृती व सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी सन २0१३ मध्ये मंत्रिमंडळाने जादूटोणा विरोधी कायदा अंमलात आणला. नरबळी इतर अमानुष, अनिष्ट, दुष्ट, अघोरी प्रथा समाजात सातत्याने उघडकिस येत आहेत.
यांना प्रतिबंध घालण्यासाठी तसेच भोंदू लोकांकडून अद्भुत, चमत्कारी किंवा शक्तिचा खोटा दावा करणार्‍यांकडे अधिकृत व शास्त्रीय वैद्यकिय उपाय करण्याचा परवाना नसेल आणि लोकांच्या विश्‍वासाला तडा जाईल, धोका निर्माण होईल, अज्ञानामुळे भोंदू लोकांचा जादूटोना करणार्‍या व्यक्तिचा आश्रय घेत आहेत. त्यांच्या कुटील कारस्थानांना बळी पडण्यापासून सर्व सामान्य लोकांना वाचविण्यासाठी उचित व कायदेविषयक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याचा अध्यादेश जारी केला.
एखाद्या व्यक्तीने केलेल्या कृतीपैकी कोणतीही कृती स्वत: करणे किंवा इतर व्यक्तिकडून करुन घेणे किंवा ती कृती करण्यास इतर कोणत्याही व्यक्तीला प्रवृत्त करणे अशा १२ कृती या कायद्याच्या अनुसूचित आहेत. अघोरी प्रथा व जादूटोणा यांच्या संबंधित जाहिरात, साहित्य, लेख किंवा पुस्तक याचे वितरण करणे किंवाव ते प्रसिद्ध करणे प्रत्येक्ष, अप्रत्यक्ष या प्रकाराला सहकार्य करणार्‍यांवरही कारवाई करता येते. जादूटोण्यांचे उपचार करण्यासाठी आक्षेपाही जाहिराती अशा व्यक्तिंवर गुन्हा दाखल करुन त्या व्यक्तीवरील दोष सिद्ध झाल्यास सहा महिने ते सात वर्ष शिक्षा तर ५ हजार ते ५0 हजार रुपयांपर्यंतचा दंड शिक्षेत ठेवण्यात आला आहे.
ज्या व्यक्तीने जी कृती केली त्या कृतीच्या संदर्भात कोट कलम दोन मध्ये शिक्षा नमूद आहे. तीच करण्यात येईल. जादूटोणा हा गुन्हा दखल पात्र व अजामिनपात्र आहे. शिक्षापात्र असलेल्या कोणत्याही अपराधाची न्याय चौकशी महनगर दंडाधिकारी किंवा प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्या न्यायालयापैक्षा कनिष्ठ दर्जाच्या न्यायालयाच्या चालवता येणार नाही. प्रत्येक पोलीस ठाण्यात दक्षता अधिकारी नियुक्त करण्यात येतील. दक्षता अधिकार्‍याचे काम पोलीस निरीक्षकही करु शकतो.
पोलिसांनी या गुन्ह्यासंदर्भात पुरावा गोळा करणे, त्याचा गुन्हा दाखल करणे दोष सिद्धीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या अध्यादेशाला अपराधांच्या अन्वेषणाला व न्याय चौकशीला संहितेच्या तरतूदी लागू असतील. कोणतेही अपराधाबद्दल सिद्धापराध ठरली असेल त्या बाबतीत अशा अपराध्याला सिद्धाअपराध ठरवणारे न्यायालय, असे अपराध घडले असेल, तेथील स्थानिक वृत्तपत्रामध्ये अशा व्यक्तीचे नाव निवासाचे ठिकाण आणि अशा अपराध्यास या अध्यादेशाखालील अपराधाबद्दल सिद्धापराध ठरवण्यात आले आहे. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यसमन्वयक प्रवीण गांगुर्डे, गोंदिया जिल्हा संघटक डॉ. प्रकाश धोटे व गोंदिया जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी उपस्थित होते.