23.5 C
Gondiā
Tuesday, July 21, 2026
Home विदर्भ नक्षलवाद्यांनी जाळले मालेवाडातील वन विभागाचे कार्यालय

नक्षलवाद्यांनी जाळले मालेवाडातील वन विभागाचे कार्यालय

0
21

गडचिरोली,दि.१६ -बुधवारी छत्तीसगडमधील विजापूर जिल्हयात नव्याने भरती झालेल्या चार पोलिसांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्यानंतर नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्हयातील मालेवाडा येथील वन विभागाचे कार्यालय आज गुरूवारी पहाटे जाळले आहे.
गडचिरोली जिल्हयातील नक्षल प्रभावित भाग असलेल्या मालेवाडा येथे वन विभागाचे कार्यालय आहे. नक्षलवाद्यांनी या कार्यालयाला जाळून टाकले. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र कार्यालयातील महत्वाचे कागदपत्रे आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या आहेत. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.