महिला शिक्षिकांवरील अन्याय दूर करा

0
15

गडचिरोली,दि.04ः- मे २0१८ मध्ये करण्यात आलेल्या संगणकीय बदली प्रक्रियेत मोठय़ा प्रमाणात अनियमितता झाली असून महिला शिक्षिकांवर अन्याय करण्यात आला आहे. हा अन्याय दूर करून महिला शिक्षिकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी अन्यायग्रस्त महिला शिक्षिकांनी व शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य महिला आगोयाला पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत ३0 किमी परिघात बदली न गरता अनेक शिक्षकांना विस्थापित करण्यात आले आहे. पती-पत्नी एकत्रीकरण लाभाचा अर्ज भरूनही दोघांपैकी एकाची बदली व दुसर्‍याला विस्थापित करून विभक्त कुटुंबापासून दूर करण्यात आले. शासन निर्णयानुसार तीन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष अवघड क्षेत्रात सेवा देवून संवर्ग ३ मध्ये अर्ज भरूनही बदली करण्यात आली नाही. सेवाज्येष्ठतेनुसार बदलीचा नियम असताना सेवाज्येष्ठ शिक्षकांना डावलून कनिष्ठ शिक्षकांना संधी देण्यात आली. त्यामुळे अनेक ज्येष्ठ शिक्षक विस्थापित झाले आहेत. तसेच जिल्ह्यातील महिला शिक्षिकांना अवघड गावे प्रतिबंधीत घोषित असतानाही त्या ठिकाणाहून त्यांना बदली मिळाली नाही. उलट अशाच गावात महिला शिक्षकांची बदली करण्यात आली आहे. यामुळे बदली प्रक्रियेत मोठय़ा प्रमाणात अनियमित झाली असून महिला शिक्षकांवर करण्यात आलेला अन्याय दूर करावा, अशी मागणी अन्यायग्रस्त महिला शिक्षिकांनी महिला आयोगाकडे केली आहे.