बुधवारी रात्री दोन अल्पवयीन मुले कुर्ला एक्स्प्रेसमधून दुर्ग ते जयपूरमार्गे गांज्याची तस्करी करत होते. रेल्वेत गस्त घालणाऱया सुरक्षा दलाच्या जवानांना त्या दोघांवर संशय आला असता त्या दोन्ही मुलांची चौकशी करीत सामानांची तपासणी केली असता त्यांच्या बॅगेमध्ये ३२ किलो गांजा आढळून आला. बाजारात या गांज्याची किंमत ३ लाख २० हजार रुपये आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी या दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आणि रेल्वे पोलीसांना सोपविण्यात आले.