समाज घडविण्याचे कार्य शिक्षक करतो-खासदार शरद पवार

0
10

गोंदिया,दि.24ः- समाजासोबतच पिढि घडविण्याचे महान कार्य सातत्याने आजपर्यंत इतिहासिक काळापासून तर आजपर्यंत शिक्षक करीत आलेला आहे.त्यातच शिक्षकाने साहित्याच्या क्षेत्रातही उल्लेखनिय कार्य करुन महाराष्ट्राला चांगले साहित्य उपलब्ध करुन दिलेले आहे.साहित्याच्याम ाध्यमातून समाजकार्य करण्याचे काम शिक्षक करीत असून प्रतिगामी शक्तींना तोड देण्याची शक्ती पुरोगामी विचारात असल्याचे विचार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी शिक्षक साहित्य समेलनाच्या उदघाटनप्रसंगी विशेष अतिथी म्हणून बोलतांना रविवारला(दि.23) केले.
समाजाला खुपआधी संत गाडगेबाबा सांगून गेलेत की देव देवळात नाही आणि दगडाच्या देवाला नमस्कार करुन समाजाचे भलेही होणार नाही.तर शिक्षण घेऊन जनजागृतीचा संदेश द्या हा त्यांचा विचार आजही तेवढाच महत्वाचा आहे.हे समाजाल पटवून देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे.
बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवलेल्या काळात महात्मा फुले,सावित्रीबाई फुले,फातिमा शेख यांच्यासारख्या पुरोगामी महानुभावांनी समाजाच्या विरोधाला डावलून शिक्षण घेतले.आणि घेतलेल्या शिक्षणाचा लाभ समाजाला देण्याचे केलेले महानकार्यामुळे आपल्या सर्वांचे खèया प्रेरणास्थान या महानुभूती असायला पाहिजे.त्यांनी त्या काळात शिक्षण घेऊन समाजासाठी उपयोगी अशा साहित्याची निर्मिती करुन साहित्याच्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिलेले आहे.साने गुरुजींनी सोप्या भाषेत कसे लिहायचे हे सांगितले.तर मराठी साहित्यात आचार्य अत्रेच्या योगदानाला विसरता येणारे नाही,असे ते आदर्श शिक्षक होते.शिक्षकांच्या बाबतील बोलतांनाच जे.पी.नाईक व चित्रा नाईक हे शिक्षक आपल्यासाठी विशेष महत्वाच्या असल्याचा उल्लेख करीत आपण शिक्षणमंत्री असताना चित्रा नाईक या शिक्षण मंडळाच्या संचालक होत्या.परंतु आपण त्यांच्यासोबत जेव्हा केव्हा शिक्षणविभागाच्याविषयावर बैठक घेतली तेव्हा कधीही मंत्री म्हणून नव्हे तर आपल्या शिक्षक समोर आहेत हे लक्षात ठेवूनच बसल्याने त्याचा लाभही झाल्याचा उल्लेख त्यांनी केला.
शिक्षक जेव्हा qचतनशील मनाने लिहायला बसतो,साहित्याच्या क्षेत्रात शिरतो तेव्हा नवे साहित्य निर्माण होते,त्यासाठी वाचनसंस्कृती महत्वाची आहे.त्याशिवाय साहित्याची जडणघडण होऊ शकत नाही.परंतु आजच्या परिस्थितीकडे बघून विचार केले तर विद्यमान केंद्रातील भाजप सरकारने संसदेत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करणारा कायदा समंत करुन लोकशाही धोक्यात आणण्याचे काम केले आहे.
आपल्या देशाच्या मोठ्या पदावर बसलेले व्यक्ती जेव्हा हास्यास्पद गोष्टीं करतात,त्याला विज्ञानाची जोड देतात त्यावरुन मनात भिती निर्माण होते.पुरातन काळापासून विज्ञानाला महत्व आहे हे नाकारता येत नाही.म्हणून काय गणपतीचा चेहरा शस्त्रक्रियेने बसविण्यात आल्याचा उल्लेख करणे,आजच्या विमानापेक्षाही आधीच्या काळातील पुष्पकविमानाचा शोध आम्ही लावल्याचे सांगत भ्रामक गोष्टींवर प्रधानमंत्री पदावर ूबसलेली व्यक्ती बोलत असेल तर साहित्यासोबतच विज्ञानाबद्दल शंका निर्माण होते.कुणी हनुमानाची जात टाकून ज्ञानात भर टाकणारी गोष्ट करणे धोकादायक आहे.जगात जे जे देश विज्ञानात पुढे गेले त्या देशांनी विकास साधला आहे,विज्ञानाशिवाय पर्याय नाही हे पाश्च्यात देशांनी स्विकारले आहे.परंतु आपल्या देशातील काही नेते पुष्पक विमानातच गुंतले असून पुष्पक विमान जुने असतांना प्रफुल पटेलांना हवाईमंत्री असताना गोंदियात विमानतळ तयार करुन वैमानिक प्रशिक्षण बनविण्याची गरजच नव्हती अशा टोला हाणताच हशा पिकला.